जेव्हा मोलकरणीने तक्रार दाखल केली, तेव्हा प्रज्वलविरुद्ध पहिला गुन्हा २८ एप्रिल २०२४ रोजी नोंदवण्यात आला. तक्रारदार महिला त्याची ४७ वर्षीय माजी मोलकरणी होती. तिने सांगितले की प्रज्वलने तिच्यावर एकदा नाही तर दोनदा बलात्कार केला. इतकेच नाही तर तिने धैर्याने अत्याचाराचा घटनेचा व्हिडिओही रेकॉर्ड केला.
न्यायालयात साडी ठरली ठोस पुरावा
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे घटनेच्या वेळी पीडितेने घातलेली साडी. तपासात त्या साडीवर शुक्राणूंचे (स्पर्म) डाग आढळले आहेत. जे फॉरेन्सिक तपासणीतही रेवन्नाचे असल्याचं निष्पन्न झालं आहे. मोलकरणीची ती साडी निर्णायक पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आली होती. हा सर्वात मोठा पुरावा मानला गेला. तसेच बलात्काराचे व्हिडिओ देखील कोर्टात सादर करण्यात आले होते. पीडितेने केवळ साडी जपून ठेवली नाही. तर तिने या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्डही केला होता.
advertisement
तीन महिलांकडून आरोप
तीन वेगवेगळ्या महिलांनी प्रज्वल रेवण्णावर बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एका ४४ वर्षीय महिलेने मे २०२४ मध्ये त्याच्याविरुद्ध वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तिसरा गुन्हा ६० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून एसआयटीने नोंदवला होता. २५०० हून अधिक अश्लील व्हिडिओंची चौकशी एसआयटीला एक पेन ड्राइव्ह सापडला आहे, ज्यामध्ये प्रज्वलशी संबंधित सुमारे २५०० अश्लील व्हिडिओ क्लिप आढळल्या आहेत. यामध्ये तो अनेक महिलांवर अत्याचार करताना दिसत आहेत, ज्यांची ओळख उघड होण्याचा धोका आहे. एसआयटीने हे व्हिडिओ इंटरनेटवरून त्वरित काढून टाकण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.
दोषी ठरवलं पण शिक्षा काय होणार?
काल कोर्टाने प्रज्ज्वल रेवण्णाला दोषी ठरवलं आहे. आज म्हणजे २ ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. आता त्याला नेमकी काय शिक्षा होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एसआयटीकडून या प्रकरणातील इतर पीडित महिलांशी देखील संपर्क साधला जात आहे. संबंधित महिलांनी समोर येऊन रेवण्णा विरोधात तक्रार दाखल केली, किंवा इतर पुरावे दिले, तर प्रज्ज्वल रेवण्णाला आखणी गंभीर शिक्षा मिळू शकते.