TRENDING:

आधी प्रेम, मग अत्याचार! 'या' मुलीला इन्स्टाग्रामवरचं प्रेम पडलं महागात; मुलगा म्हणतोय, "जिवंत सोडणार नाही"

Last Updated:

कवठेमहांकाळ तालुक्यात एका धक्कादायक घटनेत, संशयित आरोपी संकेत दत्तात्रय पाटील याने इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवून एका अल्पवयीन तरुणीला लग्नाचे...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कवठेमहांकाळ : इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवून आणि लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून कवठेमहांकाळ पोलिसांनी संशयित आरोपी संकेत दत्तात्रय पाटील (वय-21, रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) याच्याविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
Crime News
Crime News
advertisement

इन्स्टाग्रामवरून वाढवली ओळख

याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी संकेत पाटील हा पीडित तरुणीच्या नात्यातीलच आहे. त्यामुळे त्याचे पीडित तरुणीच्या घरी अधूनमधून येणे-जाणे होते. ऑक्टोबर 2023 मध्ये संकेतने पीडित तरुणीला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून तिच्याशी ओळख वाढवली. त्यानंतर तो तिच्याशी नियमितपणे बोलू लागला.

मे 2024 मध्ये संकेतने पीडित तरुणीला दंडोबाच्या पाथ्याला भेटायला बोलावले. यावेळी तरुणी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही, 'तू 18 वर्षांची पूर्ण झाल्यावर तुझ्याशी लग्न करेन,' असे आमिष दाखवून त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

advertisement

एकदा नव्हे दोनदा ठेवले संबंध

या घटनेनंतरही संकेत थांबला नाही. 20 जून 2025 रोजी तरुणी कवठेमहांकाळ येथे पार्लरमध्ये आली असताना, संकेतने तिला आपल्या दुचाकीवर बसवून पुन्हा दंडोबा डोंगराच्या पाथ्याला नेले आणि तिथे पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.  यावेळी पीडित तरुणीने त्याला सांगितले की, आता ती 18 वर्षांची झाली आहे, त्यामुळे त्याने तिच्याशी लग्न करावे. मात्र, संकेतने सरळसरळ लग्नास नकार दिला. 'तुला जे काही करायचे आहे ते कर,' असे सांगून, 'हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकीही त्याने तरुणीला दिली.

advertisement

या सर्व प्रकारानंतर पीडित तरुणीने धीर धरून कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात संशयित संकेत पाटील विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील हे करत आहेत. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : Nagpur News: 'लुटेरी दुल्हन' समीराने 8 जणांना घातला 2 कोटींचा गंडा; मोडस ऑपरेंडी पाहून व्हाल चकित!

advertisement

हे ही वाचा : Kolhapur News: मेलेली संजना जिवंत परतली! मग अंत्यसंस्कार कोणावर झाले? पोलिसांसमोर मोठा पेच!

मराठी बातम्या/क्राइम/
आधी प्रेम, मग अत्याचार! 'या' मुलीला इन्स्टाग्रामवरचं प्रेम पडलं महागात; मुलगा म्हणतोय, "जिवंत सोडणार नाही"
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल