TRENDING:

छातीवर-मानेवर ओरखडे, विद्यार्थिनीला नराधम ओढून नेताना CCTVमध्ये कैद, सामूहिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट

Last Updated:

कोलकाता लॉ कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
२५ जून रोजी कोलकाता येथील साउथ कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी पीडित विद्यार्थिनीने पोलीस ठाण्यात धाव घेत, सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये आजी-माजी विद्यार्थ्यांसह कॉलेजच्या सुरक्षा रक्षकाचा देखील समावेश आहे.
News18
News18
advertisement

मनोजित मिश्रा, प्रॉमित मुखर्जी, झैद अहमद आणि एक कॉलेज सुरक्षा रक्षक असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. पीडितेनं तक्रारीत म्हटल्यानंतर चारही आरोपी पीडितेला ओढत घेऊन जाताना कॉलेजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याने इतर आरोपींच्या मदतीने हा अत्याचार केला आहे.

advertisement

पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मनोजित याचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होतं. यातून त्याने घटनेच्या दिवशी पीडितेला लग्नाची मागणी घातली होती. पण पीडितेला बॉयफ्रेंड असल्याने तिने मनोजितचा प्रस्ताव नाकारला. तसेच आपण आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं. याचाच बदला घेण्यासाठी आरोपी मनोजितने जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला. यावेळी आरोपीनं हॉकी स्टिकने तरुणीला मारहाण केल्याचा देखील आरोप आहे.

advertisement

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी अत्याचारानंतर तिला ब्लॅकमेल करता यावं, यासाठी तिचे अश्लील व्हिडीओ देखील शूट केले, असा आरोपही पीडितेनं केला. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. लॉ कॉलेज कॅम्पसमध्ये झालेल्या कथित सामूहिक बलात्कार प्रकरणात, खळबळजनक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. ज्यात दोन आरोपी तिला जबरदस्तीने कॉलेज कॅम्पसमध्ये ओढत घेऊन जाताना दिसत आहेत. ही घटना २५ जून रोजी कॉलेजच्या गार्ड रूममध्ये घडली.

advertisement

आता तरुणीचा मेडिकल अहवाल देखील समोर आला आहे. ज्यात तरुणीच्या छातीवर, मानेवर ओरखडे असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तिच्या गुप्तांगावर कोणत्याही बाह्य खुणा आढळल्या नाहीत. मात्र बलात्काराची शक्यता नाकारता येत नाही, असं वैद्यकीय अहवालात म्हटलं आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
छातीवर-मानेवर ओरखडे, विद्यार्थिनीला नराधम ओढून नेताना CCTVमध्ये कैद, सामूहिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल