कोलकाता पोलिसांनी नोंदवलेल्या टाइमलाइननुसार, जवळच्या ताला पोलीस स्टेशनमधील अधिकार्यांचे दोन गट सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी आणि 10 वाजून 30 मिनिटांनी घटनास्थळी गेले होते. त्यांनी घटनास्थळ सील केलं. अतिरिक्त आयुक्त दर्जाचे अधिकारी आणि सहपोलीस आयुक्त दर्जाचे काही अधिकारी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, तपास विभागातील अधिकारी, फॉरेन्सिक टीम, फूटप्रिंट आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञ, एक फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर सकाळी 11 ते साडेअकराच्या दरम्यान घटनास्थळी आले होते. सहाय्यक अधीक्षकांनी सकाळी 10 वाजून 52 मिनिटांनी मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात पोहोचण्यास सांगितले. दुपारी साडेबारा वाजता पोलीस आयुक्त स्वतः घटनास्थळी आले.
advertisement
बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोणत्या देशात काय शिक्षा? तुम्हाला माहितीय का?
ड्युटीवर असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याने (ईएमओ) महिला डॉक्टरला दुपारी 12 वाजून 44 मिनिटांनी मृत घोषित केलं. यानंतर लगेचच स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं (एफएसएल) पथक तपासासाठी घटनास्थळी आलं. प्रक्रियात्मक विलंब आणि पीडितेच्या कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता, संध्याकाळी 6 वाजून 10 मिनिटे ते 7 वाजून 10 मिनिटे या वेळेत पोस्टमॉर्टेमचं डॉक्युमेंटेशन करण्यात आलं.
Explainer: POCSO कायद्यात नवीन बदल, बदलापूरच्या नराधमाला होऊ शकते फाशी?
नोंदीनुसार, तपास आणि पोस्टमॉर्टेम सुरू असताना, तपासकर्त्यांनी गुन्ह्याच्या ठिकाणच्या सर्व एंट्री आणि एक्झिट पॉईंट्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती. प्रकरणाच्या तपशीलासाठी, त्या रात्री ड्युटीवर असलेल्या पीडितेच्या चार डॉक्टर सहकाऱ्यांसह अकरा जणांची चौकशी करण्यात आली. रात्री 8:30 ते 10:45 च्या दरम्यान, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी व्हिडिओग्राफी अंतर्गत गुन्ह्याच्या ठिकाणाहून 40 वस्तू जप्त केल्या. पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
