या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही शिक्षकांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. समाधान इंगळे आणि अनिल थाटे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी शिक्षकांची नावं आहेत. यातील आरोपी समाधान इंगळे वर्गशिक्षक तर अनिल थाटे हा त्याच शाळेतला शिक्षक आहे. या दोघांनी विद्यार्थ्याच्या आईवरच वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी वर्गशिक्षकासह सहकारी शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. हे दोन्ही शिक्षक मलकापूर येथील नूतन महाविद्यालयात कार्यरत आहेत.
advertisement
तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ. पहिला नंबर आणू, यासाठी आम्हाला खूश कर, असं म्हणत संबंधित शिक्षकांनी पीडितेकडं शरीरसुखाची मागणी केली. यानंतर आरोपी वर्गशिक्षकाने आणि त्याच्या सहकारी शिक्षकाने विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी बलात्कार केला. बलात्काराची ही घटना उघडकीस आल्यानंतर मलकापूरसह शाळा परिसरात खळबळ उडालीय. पोलिसांनी दोन्ही नराधम शिक्षकांना अटक केली आहे.
आरोपी शिक्षकांनी ३४ वर्षीय पीडित महिलेला धमकी देखील दिली होती. आम्हा दोघांना खूश ठेवले नाही तर तुला आणि तुझ्या मुलाला जिवे मारू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
