अंधेरीमध्ये राहणाऱ्या 68 वर्षीय ज्येष्ठ महिलेला एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने फोनवर कुलाबा पोलिस स्टेशन मधून बोलत असल्याचे सांगितले. आणि पुढे त्या महिलेकडून बँक खात्यासंबंधित माहिती विचारली. शिवाय, तिच्याकडून ती आत्तापर्यंत कसं जीवन जगलात, असा निबंध सुद्धा लिहून घेतला. त्यानंतर तिला सांगितलं तू निर्दोष आहेस हे आम्हाला पटलं आहे. तुला सध्या घरातच अरेस्ट कऱण्यात आलं आहे. पण तुला जामीन कसा मिळेल हे आम्ही पाहतो. यानंतर या महिलेला व्हिडीओ कॉल करण्यात आला. तिथे न्यायालयासारखी रचना करण्यात आली होती.
advertisement
करण्यात आलेल्या फेक व्हिडिओ कॉलवर समोर बसलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे न्यायालयासारखी रचना करण्यात आली होती. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने त्याचं नाव डी. वाय चंद्रचूड आहे असं सांगितलं. देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड आहेत. त्या व्यक्तीने महिलेकडे तिच्या बँकेचे तपशील मागितले. त्यानंतर दोन महिन्यांत या महिलेकडून सुमारे तीन कोटी 50 लाखांची लूट करण्यात आली. त्यानंतर त्या व्यक्तीचा फोन नंबर महिलेला बंद येऊ लागला. त्या व्यक्तीने तिला फोन करणे सुद्धा बंद केले. त्या ज्येष्ठ महिलेला जेव्हा आपली फसवणूक झाल्याचे कळले. तेव्हा त्या महिलेने थेट पोलिसांशीच संपर्क केला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी महिलेला सांगितलं की आम्ही या प्रकरणात एका व्यक्तीला अटक केली आहे. इतर लोकांनाही आम्ही शोधत आहोत. डिजिटल अरेस्ट प्रकरणात महिलेने सर्वाची सर्व आपली सेव्हिंग रक्कम गमावून बसली आहे. 18 ऑगस्ट ते 13 ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या महिलेला डिजिटल अरेस्ट करण्यात आलं आणि तिच्याकडून 3 कोटी 50 लाखांची रक्कम या संपूर्ण कालावधीत उकळण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केली आहे. ज्या माणसाने 6 लाखांच्या कमिशनच्या बदल्यात 1 कोटी 71 लाख रुपये आपल्या अकाऊंटमध्ये ठेवण्याची संमती सदर महिलेला लुटणाऱ्या टोळीला त्याच्या बँक खात्यावर रक्कम ठेवण्याची संमती दिली होती.
