...असा घडला आणखी एक गुन्हा
ही घटना ग्वाल्हेरच्या घाटीगाव पोलीस स्टेशन परिसरात घडली. ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंह यादव यांनी सांगितले की, "पोलीस तपासात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या एका खून प्रकरणातील तक्रारदाराला अडकवण्यासाठी तुरुंगातीलच एका आरोपीने कट रचल्याचं उघड झालं आहे. एका महिला नातेवाईकाच्या मदतीने त्याने तक्रारदारावर बलात्काराचा आरोप केला. त्या महिलेने सांगितलं होतं की, घाटीगावच्या घेघोलीमधील जंगलात बलात्कार झाला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला, तेव्हा प्रकरण संशयास्पद वाटलं. गांभीर्य लक्षात घेऊन तपास अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि 7 तासांच्या तपासाअंती हे प्रकरण खोटं असल्याचं समोर आलं. या गोष्टीचा पर्दाफाश होताच, महिलेने तक्रार देण्यास नकार दिला. आता पोलीसच त्या महिलेवर कारवाई करत आहेत."
advertisement
जमिनीच्या हव्यासापोटी खून, त्यानंतर...
पोलrस तपासात असं समोर आलं की, 2 महिन्यांपूर्वी बेलगढा भागात 67 वर्षीय कुसुम बाई यांची हत्या झाली होती. या प्रकरणी मानसिंग जाटाव, नारायण प्रजापती आणि हकीम प्रजापती यांच्यावर आरोप होता. त्यांनी जमिनीच्या हव्यासापोटी खून केल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणातील आरोपी तुरुंगात आहेत आणि मयत महिलेचा नातू आकाश प्रजापती हा मुख्य साक्षीदार आहे. केसमध्ये सेटलमेंट करण्याची ऑफर देऊनही तो तयार झाला नाही. त्यानंतर मानसिंगने त्याच्यावर दबाव आणण्यासाठी कट रचला. यासाठी त्याने आपल्या मुलाच्या बायकोच्या बहिणीला बलात्कार केस दाखल करण्यासाठी तयार केलं.
तपासानंतर खोटं उघड, महिलेने तक्रार न देताच काढता घेतला पाय
पोलिसांना हे समजताच त्यांनी महिलेची चौकशी केली. तेव्हा ती आकाशला फसवण्यासाठी 8 दिवसांपासून कारस्थान करत होती, असं उघड झालं. कटानुसार, तिने आकाश प्रजापतीची गाडी भाड्याने घेतली आणि मोहाना गुरुद्वारा येथे पोहोचली. काही मिनिटे थांबल्यानंतर ती घाटीगावच्या जंगलात पोहोचली आणि तिथे गाडी थांबवून फोटो आणि व्हिडिओ काढले. मात्र पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यानंतर तपास केला आणि महिलेचं खोटं उघड झालं. त्यानंतर ती तक्रार न करताच निघून गेली. सध्या, पोलिसांनी खोटी कहाणी सांगून पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल महिलेवर कारवाई सुरू केली आहे.
हे ही वाचा : आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलीसह नातूला साखळदंडाने बांधलं, जालन्यातील भंयकर प्रकार
हे ही वाचा : Online Fraud: "पहिले पैसे द्या, मग पैसे मिळवा", ही स्किम तरुणाला पडली महागात, 52 लाखांना लागला चुना