Online Fraud: "पहिले पैसे द्या, मग पैसे मिळवा", ही स्किम तरुणाला पडली महागात, 52 लाखांना लागला चुना
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
ऑनलाइन फसवणुकीच्या एका प्रकरणात आरोपीने पीडिताला "पहिले पैसे द्या, मग पैसे मिळवा" असे सांगितले. पीडितेने त्याच्या मित्राला कळवले आणि सरकारच्या NCR पोर्टलवर तक्रार केली. साइबर क्राईम पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी सुरू आहे.
महाठग लोकांची फसवणूक करण्यात तरबेज असतात. कधी-कशी आपली फसवणूक करतील याचा नेम नसतो. कधी-कधी ते इतक्या सराईतपणे चोरी करतात की, त्यांची चोरीची पद्धत्त पाहून पोलिसही चकित होऊन जातात. असंच एक प्रकरण उत्तरप्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्ह्यात समोर आलं आहे. एका तरुणाला प्रीपेड टाक्समधून मोठा फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं आणि तब्बल 52 लाखांची फसवणूक केली.
8 हजारांच्या आमिषाने 52 लाखांचा गंडा!
त्या सायबर गुन्हेगारांनी एका तरुणाला प्रीपेड टास्कच्या माध्यमातून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखलं. हा तरुणांत्या त्यांच्या जाळ्यात सापडला. आरोपींनी त्याला दररोज 2000 ते 8000 रुपये कमवण्याचं लालच दिलं. अशा प्रकारे, त्याची 51 लाख 63 हजार रुपयांची फसवणूक केली. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून सायबर क्राईम पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
advertisement
...असं लुटलं गेलं
ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये राहणाऱ्या अभिनव शर्माने पोलिसांना सांगितलं की, 18 जानेवारीला त्याला व्हॉट्सॲपवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला. मेसेज पाठवणाऱ्या महिलेने तिची ओळख पल्लवी म्हणून सांगितली. तिने प्रीपेड टास्क पूर्ण करून मोठा नफा कमावण्याबद्दल माहिती दिली. तिने सांगितले की, "असं केल्याने तो दररोज 2000 ते 8000 रुपये कमवू शकतो. बोलता बोलता, पीडित व्यक्ती महिलेच्या बोलण्यात अडकला. त्यानंतर, महिलेने पीडित व्यक्तीला टेलीग्राम ग्रुपमध्ये ॲड केलं."
advertisement
मेसेजच्या माध्यमातून झालेल्या संभाषणात महिलेने प्रीपेड टास्कच्या नफ्याबद्दल आणि क्रिप्टो करन्सीबद्दल माहिती दिली. सुरुवातीला ट्रेनिंग दिलं गेलं. पीडित व्यक्तीने सांगितलं की, "18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान, एकूण 32 वेळा त्याने 51 लाख 63 हजार 277 रुपये वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ट्रांसफर केले."
कसा अडकला पीडित?
त्यांनी दिलेल्या लिंकवर पीडित व्यक्तीला 60 लाखांचा नफा दिसत होता. जेव्हा पीडित व्यक्तीने पैसे परत मागितले, तेव्हा ठगबाजांनी व्हीआयपी चॅनल, कन्स्ट्रक्शन टॅक्स, पेनल्टी भरण्याच्या नावाखाली त्याच्याकडून आणखी पैशांची मागणी केली. आरोपींनी पीडित व्यक्तीला आधी पैसे देण्यास सांगितलं, त्यानंतर त्याला पैसे मिळतील असं सांगितलं. दरम्यान, त्याने त्याच्या मित्राशी बोलून या फसवणुकीबद्दल त्याला माहिती दिली. यानंतर, पीडित व्यक्तीने भारत सरकारच्या एनसीआर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार दाखल केली. सायबर क्राईम पोलीस स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 04, 2025 3:07 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Online Fraud: "पहिले पैसे द्या, मग पैसे मिळवा", ही स्किम तरुणाला पडली महागात, 52 लाखांना लागला चुना