आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलीसह नातूला साखळदंडाने बांधलं, जालन्यातील भंयकर प्रकार
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Jalna: जालना जिल्ह्यातील आलापूर गावात आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून एका तरुणीला तिच्या कुटुंबीयांनी दोन महिने साखळदंडांनी बांधून ठेवल्याची घटना समोर आली आहे.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी जालना: जालना जिल्ह्याच्या भोकरदन शहराजवळील आलापूर गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ठिकाणी एका तरुणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या माहेरच्या लोकांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. पीडित महिला लग्नानंतर पाच वर्षांनी आपल्या बहिणीला भेटायला माहेरी आली होती. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी तिच्यासह त्याच्या लहान बाळाला साखळदंडांनी बांधून ठेवलं. एक-दोन दिवस नव्हे तर तब्बल दोन महिने दोघांना डांबून ठेवण्यात आलं होतं. आता पोलिसांनी दोघांची सुटका केली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शहनाज उर्फ सोनल असं पीडित महिलेचं नाव आहे. शहनाजने पाच वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे राहत असलेल्या सागर या मुलासोबत आंतरधर्मीय विवाह केला होता. हे लग्न शहनाजच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. त्यांनी सुरुवातीपासून या लग्नाला विरोध केला. पण मुलीने कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन संबंधित मुलासोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली होती. या दाम्पत्याला एक मुलगाही झाला.
advertisement
दरम्यान, अलीकडेच पीडित महिला आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी माहेरी गेली होती. पण आंतरधर्मीय लग्न केल्याचा मनात राग धरून विवाहितेच्या आई वडिलांनी पोटच्या मुलीला आणि नातवंडाला 2 महिने डांबून ठेवलं. दोघांच्याही हाता-पायाला साखळीने बांधल्याची माहिती आहे. पत्नीसह मुलाला अशाप्रकारे सासुरवाडीच्या लोकांनी डांबून ठेवल्यानंतर पीडित विवाहितेच्या पतीने औरंगाबाद खंडपीठासमोर दाद मागितली. न्यायालयाने पीडित तरुणाची सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर भोकरदन पोलिसांना विवाहितेची सुटका करून तिला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले.
advertisement
त्यानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहिता आणि तिच्या मुलाची सुटका केलीय. तसेच सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीच्या ताब्यात दिले आहे. शिवाय भविष्यात या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचं आश्वासन देखील पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास भोकरदन पोलीस करत आहेत.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
February 04, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलीसह नातूला साखळदंडाने बांधलं, जालन्यातील भंयकर प्रकार