TRENDING:

खून का बदला खून! शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट, समाधान मुंडेबाबत मोठी अपडेट

Last Updated:

Crime in Beed: बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला अलीकडेच मुंडे गँगकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड: बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला अलीकडेच मुंडे गँगकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. १० ते १२ जणांनी शिवराजचं अपहरण करून त्याला डोंगरात नेलं होतं. त्यासाठी आरोपींनी रिंगण करून बेदम मारहाण केली. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. आधीच बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापलं आहे. अशात शिवराज दिवटेला झालेल्या मारहाणीनंतर बीडमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही? असा सवाल विचारला जातोय.
News18
News18
advertisement

दरम्यान, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. दिवटेला मारहाण करताना व्हिडीओत दिसणाऱ्या लांब केस असलेल्या समाधान मुंडेला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. याप्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. समाधान मुंडेला आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच दिवटेला मारहाण झाल्याचं सांगण्यात आहे.

नेमकं प्रकरण काय?

advertisement

१६ मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला परळी तालुक्याच्या लिंबोटी येथील रहिवासी असणारा शिवराज दिवटे मित्रांसोबत गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर मुंडे गँगने शिवराजचं अपहरण करून डोंगरात नेलं. तिथे आरोपींनी रिंगण करून बेदम मारहाण केली. त्यानंतर पायाही पडायला लावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी वातावरणात मोठे बदल, हवामान खात्याकडून अलर्ट
सर्व पहा

शिवराजच्या जबाबावरून पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. एकीकडे शिवराज दिवटे मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत असताना, आता जलालपूरमध्ये समाधानलाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ देखील रविवारी व्हायरल झाला. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
खून का बदला खून! शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट, समाधान मुंडेबाबत मोठी अपडेट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल