नकुल भोईर आणि त्यांची पत्नी चैताली यांच्यामध्ये संशय घेण्यावरून कौटुंबिक वाद निर्माण झाले होते. 23 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर या त्यांच्यातील वादाचे पर्यावरण भांडणात झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात चैतालीने पती नकुल भोईर यांचा कपड्याने गळा आवळून निर्घृण खून केला होता. घटनेची माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपी पत्नी चैतालीला ताब्यात घेतलं होतं.
advertisement
सुरुवातीला त्यांच्या पत्नीनेच पतीचा खून केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, पोलिसांनी नकुल यांच्या पत्नीची चौकशी सुरू केली. त्याशिवाय, आपल्या पद्धतीने तपास सुरू केला. अखेर पोलीस तपासात या हत्येत आणखी एकाचा सहभाग असल्याचे समोर आले. ही हत्या चैताली भोईर हिने एकटीने नव्हे, तर तिच्या परिचित सिद्धार्थ पवार यांच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून केला.
नकुल भोईर हे स्थानिक सामाजिक क्षेत्रात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. आगामी महापालिका निवडणुकीत आपल्या पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी, यासाठी नकुल यांनी मोठी तयारी केली होती. जिला नगरसेवक बनवायचं होतं. त्याच पत्नीने नकुल यांची हत्या केली. सुरुवातीला पोलिसांना हा वैयक्तिक वादातून घडलेला प्रकार वाटत होता. परंतु चौकशीत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या. चौकशीदरम्यान सिद्धार्थ पवारचं नाव समोर आलं. पोलिसांनी दोन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर अखेर सिद्धार्थ पवारला अटक केली असून, त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.
नकुल भाईर हे परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. पिंपरी चिंचवड भागात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. नकुल भोईर हे शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि विविध सामाजिक चळवळीत सक्रिय होते. चिंचवडगाव आणि शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी आग्रही असायचे. अशा सामाजिक कार्यकर्त्याची मध्यरात्री अचानक हत्या झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
