काय आहे घटना -
एका तरुणाला आपल्या प्रेयसीसोबत ऐशोआरामात जीवन जगायचे होते आणि तसेच आपल्या प्रेयसीच्या आईच्या उपचारासाठीही पैशांची गरज होती. त्याने यासाठी चोरी केली. याप्रकरणी बंगळुरुच्या जिगणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी हा एक डान्स मास्टर असल्याचे सांगितले जात आहे.
सैयद अली बालसाहेब नदाफ (वय-25) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या प्रेयसीची आई हृदयविकाराने त्रस्त असल्याने तिच्या उपचारासाठी पैसे उभे करण्यासाठी त्याने चोरी करण्याचे ठरवले. आरोपी प्रियकर हा गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्याच्या हल्लूर गावातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
advertisement
सैयदने ऑगस्ट महिन्यात बंगळुरू बाहेरच्या परिसरातील अनेकल तालुक्याच्या जिगणी जवळ सत्तार नावाच्या व्यक्तीच्या दुकानातून रत्नम्मा नावाच्या एका महिलेची चैन चोरी केली होती. बुलेटवर येत त्याने सिगारेट खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील चैन चोरत तो फरार झाला होता. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आता त्याला अटक केली आहे.
ऐशोआरामात जगण्यासाठी केलं मोठं कांड, ‘त्या’ पैशातून आयफोन, पल्सर खरेदी, शेवटी अकडलेच!
आपल्या प्रेयसीसोबत ऐशोआरामाचे जीवन जगण्यासाठी आणि तिच्या आईचा उपचाराचा खर्च करण्यासाठी तो दागिने तसेच दुचाकींची चोरी करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीकडून 8 लाख रुपये किंमतीचे दागिने आणि 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या आरोपीवर बंगळुरू शहर, तुमकुर, दावणगेरे याठिकाणी 8 दुचाकी चोरी आणि चैन चोरीप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
तर पोलीस कस्टडीतून आरोपी फरार झाल्यानंतर गदग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आणि स्टाफला निलंबित करण्यात आले होते. यानंतर आता त्याला पुन्हा अटक करुन परप्पन अग्रहार तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
