ऐशोआरामात जगण्यासाठी केलं मोठं कांड, 'त्या' पैशातून आयफोन, पल्सर खरेदी, शेवटी अकडलेच!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
crime news - एका व्यापारी वसूली करुन परतताना त्याच्याकडून 7 लाख 80 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली होती. कोलकसा चौकात ही घटना घडली होती. रेकी करुन आरोपींनी ही चोरीची घटना घडवली.
सूर्यकांत यादव, प्रतिनिधी
राजनांदगांव : गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असून आर्थिक फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. बंगुळरू येथील एका व्यावसायिकाच्या घरून 15 कोटी रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कलकसा चौकात 25 ऑक्टोबर रोजी व्यापाऱ्याच्या जवळ 8 लाख रुपयांच्या चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. यामध्ये एका अल्पवयीनाचाही समावेश आहे. छत्तीसगड राज्यातील राजनंदगाव येथील ठेलकाडीह परिसरात ही घटना घडली होती.
advertisement
आरोपींनी चोरीच्या पैशात मौजमस्ती केली. यामध्ये त्यांनी नवीन आयफोन खरेदी केला. तसेच पल्सर बाइक आणि इतर सामानही खरेदी केला. तर आरोपींकडून पोलिसांनी 5 लाख रुपयांची रोख रक्कम जमा केल्याचीही माहिती एसपी त्रिलोक बंसल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
advertisement
एका व्यापारी वसूली करुन परतताना त्याच्याकडून 7 लाख 80 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली होती. कोलकसा चौकात ही घटना घडली होती. रेकी करुन आरोपींनी ही चोरीची घटना घडवली. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला आणि आरोपींना अटक केली. चोरीच्या पैशातून महागड्या वस्तू खरेदी करून ऐशो आरामाचे जीवन जगण्याचे स्वप्न आरोपींनी पाहिले होते. त्यामुळे दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी या पैशाचा वापर महागड्या वस्तू खरेदी करून चैनीवर खर्च केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
Location :
Jharkhand
First Published :
November 09, 2024 7:29 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ऐशोआरामात जगण्यासाठी केलं मोठं कांड, 'त्या' पैशातून आयफोन, पल्सर खरेदी, शेवटी अकडलेच!