अटक केलेल्या आरोपींची नावे
- युवराज रावसाहेब माळी (वय-30, रा. फिल्टर हाऊसजवळ, चिपरी)
- सूरज बाबासो ढाले (वय-30, रा. खोची, ता. हातकलंगले)
- गणेश संभाजी माळी (वय-25, रा. माळभाग, चिपरी)
'लिफ्ट'च्या बहाण्याने खून
बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास संदेशचा धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. सुरुवातीला खुनाचे कारण अस्पष्ट होते, त्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू होते. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संदेशच्या मोपेडवर पावसाळी जर्किन घातलेला एक व्यक्ती बसलेला दिसला. त्याच्या वर्णनावरून पोलिसांनी माहिती मिळवली. पोलिसांना आरोपी कर्नाटकातील चिक्कोडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली.
advertisement
नेमकं काय घडलं?
संदेश आपल्या बहिणीला चिपरी फाटा येथे सोडून गावाकडे परत येत होता. त्याचवेळी लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आरोपी युवराज माळी त्याच्या मोपेडवर बसला. ऑईल मिलजवळ आल्यानंतर युवराजने धारदार शस्त्राने संदेशच्या मानेवर सपासप वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर, सूरज आणि गणेश यांच्या मदतीने युवराज कर्नाटकात पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत, मृत संदेशच्या बहिणीने युवराजच्या आईबद्दल अपशब्द वापरले होते, याच रागातून युवराजने खुनासारखे गंभीर पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा : 1.80 लाख देऊन केले लग्न; टोळीने नवऱ्याच्या गाडीवर हल्ला, 35000 बॅग घेऊन नवरीने ठोकली धूम!
हे ही वाचा : 'उशिरा का आलीस?' म्हणत पती बनला हैवान; लाकडी दांडक्याने पत्नीला इतकी मारहाण केली की, त्यातच...