मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तांग कापलेल्या व्यक्तीचं नाव, जोगिंदर लखन महतो (44) असून आरोपी तरूणीचं नाव कंचनदेवी राकेश महतो (25) असं आहे. गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून दोघांचेही एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, जोगिंदरचं पूर्वीच लग्न झालं होतं. जोगिंदर हा कंचनदेवीच्या वहिनीचा भाऊ होता. दोघेही विवाहित असून त्यांना दोन मुलं आहेत. जोगिंदरचं कंचनदेवीसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होतं. कंचन जोगिंदरला त्याच्या पत्नीला सोडून तिच्यासोबत राहण्यासाठी आणि लग्न करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती. तिच्यामुळे जोगिंदरच्या कुटुंबामध्ये वारंवार वादाचे खटके उडत होते.
advertisement
जोगिंदर जांभळीपाड्यामध्ये राहत होता, तो एका ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करायचा. कंचन सतत जोगिंदरवर लग्नासाठी दबाव टाकत असल्यामुळे घरामध्ये वारंवार वादाचे खटके उडत होते, त्यामुळे जोगिंदरने नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या मुळगावी बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. तरीही जोगिंदरला कंचनचे सतत फोन यायचे. जोगिंदरने कंचनवर काही आरोप केले आहेत. "मी बिहारला असताना कंचन मला सतत फोन करून मुंबईला परत येऊन माझ्यासोबत लग्न कर." अशी कंचन मला धमकी द्यायची, असा आरोप जोगिंदरने केला आहे. 19 डिसेंबर रोजी जोगिंदर पुन्हा मुंबईत परतला. मात्र, त्याने कंचनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
24 डिसेंबरला कंचन आणि जोगिंदरची भेट झाली होती. त्या भेटी जोगिंदरने कंचनच्या समोर आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा पाढा वाचत लग्न करण्यासाठी नकार दर्शवला. याच गोष्टीचा मनामध्ये राग ठेवून कंचनदेवीने जोगिंदरला 31 डिसेंबर 2025 च्या आणि 1 जानेवारी 2026 च्या मध्यरात्री घरी बोलावले. मध्यरात्री 01:50च्या सुमारास जोगिंदर कंचनच्या घरी गेला. तेव्हा तिथे कंचनची सुद्धा मुलं होती. दोन्हीही मुलं झोपल्यानंतर कंचनने स्वयंपाकघरातील चाकू आणून जोगिंदरवर अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कंचनने जोगिंदरचा प्रायव्हेट पार्टच कापला. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू केला. या गंभीर अवस्थेतही त्याने कसेबसे आपले घर गाठले.
रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या वडिलांना पाहून मुलाने जोगिंदरला तात्काळ सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. हल्ल्यासंबंधित माहिती मिळताच वाकोला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कंचनदेवी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी महिला आपल्या मुलांसह फरार झाली असून, पोलीस पथक सध्या तिचा शोध घेत आहेत.
