80 वर्षांपूर्वी छोटीशी सुरुवात
अमरावतीत अनेक जुनी दुकाने आणि पारंपरिक व्यवसाय आहेत. त्यामध्ये शर्मा कुटुंबाने सुरू केलेल्या या नाश्ता सेंटरने खास स्थान निर्माण केलं. सुमारे 80 वर्षांपूर्वी राजेंद्रकुमार शर्मा यांच्या वडिलांनी एका छोट्याशा दुकानातून या व्यवसायाची सुरुवात केली. दही वडा, समोसा आणि मोजकेच पदार्थ असले तरी त्या पदार्थांमधील घरगुती चव आणि सातत्याने राखलेली गुणवत्ता ग्राहकांना पुन्हा पुन्हा खेचून आणू लागली.
advertisement
मोमोज ते चिकन नगेट्स, फक्त 60 रुपयांसून घ्या आस्वाद, मुंबईत हे आहे लोकेशन
हळूहळू नाश्ता सेंटरचा विस्तार होत गेला. गिला वडा, कांजी वडा यांसारख्या पदार्थांची मेन्यूमध्ये भर पडली. मात्र पदार्थ वाढले तरी मूळ तत्त्वे बदलली नाहीत. प्रत्येक पदार्थात चव, स्वच्छता आणि सातत्य यांना प्राधान्य देण्यात आलं. याच कारणामुळे नानकरामजी दहीवडेवाले हे नाव अमरावतीतील बेस्ट नाश्ता सेंटर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
कांजी वडा अतिशय प्रसिद्ध
येथील सर्वात खास आणि लोकप्रिय पदार्थ म्हणजे कांजी वडा. आंबट-तिखट चवीचा हा कांजी वडा आज अमरावतीच्या सीमांपुरता मर्यादित राहिलेला नाही. परदेशात राहणारे अमरावतीकर देखील या चवीची आठवण जपून आहेत. काहीजण खास अमरावतीत आल्यावर इथे आवर्जून हजेरी लावतात, तर काही ठिकाणी ही चव पोहोचवण्याची मागणीही केली जाते.
एका दुकानाची झाली तीन दुकाने
काळानुसार व्यवसायाची जबाबदारी राजेंद्रकुमार शर्मा यांनी समर्थपणे सांभाळली. आज त्यांच्या तीन मुलांकडून हा 80 वर्षांचा वारसा पुढे नेला जात आहे. एकाच परिसरात तीन दुकाने सुरू असली, तरी गर्दी मात्र कमी होत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ग्राहकांची रांग हीच या चवीची खरी साक्ष आहे. परंपरा, मेहनत आणि चव यांचा सुंदर संगम म्हणजे नानकरामजी दहीवडेवाले.





