रीवा - सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. मात्र, हे सर्व करत असताना स्मार्टफोन वापरत असताना काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे अन्यथा तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे नेमकी काय काळजी घ्यावी, हेच आपण जाणून घेऊयात.
रीवा पोलिसांनी याबाबत जनजागृती केली. यामध्ये रीवा शहराच्या पोलीस अधीक्षक रितू उपाध्याय यांनी महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की,
advertisement
अनेकदा लोक खराब झालेला मोबाईल फोन विक्रेत्यांना किंवा फेरीवाल्यांना अगदी काही पैशांसाठी विकतात. मात्र, जर तुमचा बंद फोन हा चुकीच्या लोकांच्या हातात पोहोचला तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोबाईलबाबत काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बंद पडलेल्या मोबाईलवरुनही सायबर क्राइमची घटना घडू शकते. इतकेच नव्हे तर फॅक्टरी रिसेट केल्यानंतरही विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून डाटा रिकव्हर केला जाऊ शकतो.
मोबाईल खराब झाल्यावर अनेकदा लोक नवीन मोबाईलचा पर्याय शोधतात. तर काही जण जुना मोबाईलच रिपेअर करण्याचा निर्णय घेतात. अशावेळी तो मोबाईल अनेकदा भंगार समजून कमी किंमतीत विकला जातो. मात्र, यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.
धनत्रयोदशीला पती-पत्नीनं केली हजारो रुपयांची खरेदी, पण नंतर अचानक घडलं कांड
तुमचा मोबाईल फोन हा कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. विशेष म्हणजे सध्याच्या काळात मोबाईलच्या माध्यमातून अनेक प्रकारची फसवणूक केली जात आहे.
रीवाचे एसपी विवेक सिंह काय म्हणाले -
याबाबत आम्ही एका फेरीवाल्यासोबत संवाद साधला असता त्याने सांगितले, तो की पॅड वाला फोन 10 ते 20 रुपयांत लोकांपासून घेतो. तर अँड्रॉईड फोन 50 रुपयांपर्यंत घेतो. ही प्रक्रिया इथेच संपत नाही. तर यानंतरही तो या मोबाईलची पुन्हा पुढे विक्री करतो.
मोबाइल एक्सपर्ट काय म्हणतात?
जर घरात कोणताही मोबाईल बंद पडला असेल, खराब झाला असेल तर त्याला भंगारमध्ये देणे धोक्याचे ठरू शकतो. कारण यामध्ये स्कॅमर्स वाय-फाय जोडून विना सिमकार्ड टाकता डाटा रिकव्हर करतात.
