TRENDING:

'कॅबिनमध्ये बोलवायचा अन् रात्री VIDEO...' बड्या IAS अधिकाऱ्यावर महिलेचे गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

Last Updated:

Crime News: देशातील प्रशासकीय विभागाला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनं वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
देशातील प्रशासकीय विभागाला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेनं वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरोपी आयएएस अधिकाऱ्याने आपल्याला अमानुष वागणूक देत, आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने केला आहे. कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने अशाप्रकारे आरोप केल्याने प्रशासकीय खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Ai Generated Photo
Ai Generated Photo
advertisement

ही घटना उत्तर प्रदेशातील नोएडा येथील आहे. येथील एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यावर त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. या अधिकाऱ्यावर अमानुष वागणूक, शोषण आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. महिला कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून या प्रकरणाची तक्रार केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी वरिष्ठ आयएएस अधिकारी नोएडाच्या राज्य कर विभागात कार्यरत आहे. महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, हा अधिकारी त्यांना गुलामांसारखी वागणूक देतो. शिवीगाळ करतो आणि त्यांच्या कामाबद्दल नेहमी अपशब्द वापरतो. जर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत, तर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देतो.

advertisement

एका पीडित महिलेने सांगितले की, 'गेल्या चार महिन्यांपासून या अधिकाऱ्याकडून हा त्रास सुरू आहे. मी त्यांचे ऐकले नाही, तर ते मला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत होता. इतर काही महिलांनीही या अधिकाऱ्याने लैंगिक छळ केल्याचे म्हटले आहे.

व्हिडिओ कॉल करून त्रास आणि व्हिडिओ बनवण्याचा आरोप

महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीनुसार, हा अधिकारी महिलांना त्याच्या खोलीत बोलावतो आणि तासनतास उभे करून ठेवतो. त्यांच्याशी अश्लील भाषेत बोलतो आणि वाईट नजरेने बघतो. रात्रीच्या वेळी व्हिडिओ कॉल करून त्रास देतो. इतकंच नाही, तर तो लपूनछपून महिलांचे व्हिडिओ बनवतो. याविरोधात तक्रार केल्यास निलंबनाची धमकी देतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी या तक्रारीला दुजोरा दिला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'कॅबिनमध्ये बोलवायचा अन् रात्री VIDEO...' बड्या IAS अधिकाऱ्यावर महिलेचे गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल