दरम्यान, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. दिवटेला झालेली मारहाण केवळ ट्रेलर आहे. खरा पिक्चर मात्र वेगळाच असल्याचं समोर आलं आहे. खरं तर, शिवराज दिवटेला झालेली मारहाण ही बदल्यातून झाल्याचं सांगितलं जातंय. कारण दिवटेला मारहाण करताना व्हिडीओत दिसणाऱ्या लांब केस असलेल्या समाधान मुंडेला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. त्यामुळे समाधान मुंडेला आधी मारहाण झाली होती, याचाच बदला घेण्यासाठीच दिवटेला मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
16 मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला परळी तालुक्याच्या लिंबोटी येथील रहिवासी असणारा शिवराज दिवटे मित्रांसोबत गेला होता. तेथे किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर मुंडे गँगने शिवराजचं अपहरण करून डोंगरात नेलं. तिथे आरोपींनी रिंगण करून बेदम मारहाण केली. त्यानंतर पायाही पडायला लावले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
शिवराजच्या जबाबावरून पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. एकीकडे शिवराज दिवटे मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत असताना, आता जलालपूरमध्ये समाधानलाही मारहाण झाल्याचा व्हिडीओ देखील रविवारी व्हायरल झाला. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे.
