प्रियकराने पोलिसांकडे तक्रार केली होती
मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय चांदणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, यामुळे तिचे वडील मनोज सिंह खूप संतापले होते. याच रागातून त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली. हत्येनंतर पुरावा सापडू नये म्हणून त्यांनी मक्याच्या शेतात खड्डा खणून मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला, पण चांदणीच्या प्रियकराने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलिसांनी श्वानपथकाची मदत घेतली.
advertisement
मुलीच्या प्रेमसंबंधांमुळे वडील संतप्त होते
तुरकौलिया पोलीस स्टेशनचे प्रभारी सुनील कुमार यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. पोलिसांनी वैज्ञानिक पुरावे आणि फॉरेन्सिक तपासाचा आधार घेतला. श्वानपथकाच्या मदतीने चांदणीचा मृतदेह मक्याच्या शेतातून शोधून काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मनोज सिंहला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान, मनोज सिंहने आपली मुलगी मारल्याची आणि मृतदेह पुरल्याची कबुली दिली. त्याने सांगितलं की, तो आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधांवर खूप संतापला होता, म्हणूनच त्याने हे भयानक पाऊल उचललं.
पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे जप्त केले
मोतिहारीचे सदर एएसपी शिवम धाकर यांनी सांगितलं की, पोलिसांनी वैज्ञानिक पुरावे आणि डीएनए चाचणीच्या आधारे हे प्रकरण उघडकीस आणलं आहे. एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं होतं आणि 4 दिवसांच्या आत आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून रसायने आणि इतर पुरावेही जप्त केले आहेत. या घटनेमुळे समाजात असलेल्या 'ऑनर किलिंग'च्या मानसिकतेवर प्रकाश पडतो. तसेच, प्रेमाची किंमत एका मुलीला आपला जीव देऊन कशी चुकवावी लागली, हे देखील यातून दिसून येतं. पोलिसांनी या प्रकरणात पुढील कारवाई सुरू केली असून, इतर संशयितांचाही तपास सुरू आहे.
हे ही वाचा : बाॅयफ्रेंड बुरखा घालून भेटायला आला, गर्लफ्रेंडने लग्नास नकार दिला; पुढे जे क्रूर कृत्य झालं ते पाहून चक्रावले पोलीस
हे ही वाचा : 'प्रेमात आडवी येतेय', म्हणून 16 वर्षांच्या मुलीने आईचा चिरला गळा; बाॅयफ्रेंडसोबत मिळून रचला होता कट! वाचा सविस्तर