बाॅयफ्रेंड बुरखा घालून भेटायला आला, गर्लफ्रेंडने लग्नास नकार दिला; पुढे जे क्रूर कृत्य झालं ते पाहून चक्रावले पोलीस
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
दिल्लीतील अशोक नगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी तौफीक नावाचा प्रियकर बुरखा घालून आपली प्रेयसी नेहा हिला भेटण्यासाठी तिच्या घराच्या छतावर...
दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून तिच्या घराच्या छतावर पोहोचला. आपल्या प्रियकराला पाहून प्रेयसीही त्याला भेटण्यासाठी छतावर आली. पण प्रियकर येताच त्याने असे काही केले की तुम्हालाही धक्का बसेल. नेमके काय घडले, ते जाणून घेऊया...
गर्लफ्रेंडला पाचव्या मजल्यावरून फेकले
खरं तर, ही घटना दिल्लीतील अशोक नगर परिसरातील आहे. येथे सोमवारी सकाळी तौफिक नावाचा एक मुस्लिम तरुण बुरखा घालून त्याची प्रेयसी नेहाच्या घराच्या छतावर पोहोचला. त्याची प्रेयसी त्याला भेटण्यासाठी आली असता, तौफिकने नेहाला पाचव्या मजल्यावरून थेट खाली रस्त्यावर फेकून दिले. खाली पडल्याने नेहा गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपी तौफिक पुन्हा बुरखा घालून पळून गेला. दरम्यान, 19 वर्षीय नेहाला जीबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा रात्री मृत्यू झाला.
advertisement
3 वर्षांचं प्रेम, अचानक बोलणं बंद अन्...
पोलीस सूत्रांनी सांगितले की, नेहा हिंदू कुटुंबातील होती आणि अशोक नगरमध्ये तिच्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या आई-वडिलांव्यतिरिक्त नेहाला कुटुंबात दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. 12 वी पास केल्यानंतर नेहा एका कंपनीत काम करत होती. नेहाचा प्रियकरही न्यू अशोक नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होता आणि एका किराणा दुकानात काम करत होता.
advertisement
तो तरुण आणि मुलगी तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांची सुरुवातीला मैत्री झाली, नंतर त्यांचे प्रेमात रूपांतर झाले. आरोपी तरुण नेहमीच त्याच्या प्रेयसीच्या घरी येत असे. काही दिवसांपासून दोघांमध्ये काही गोष्टींवरून नाराजी होती. त्यामुळे त्यांच्यातील संवाद थांबला होता.
लग्न करायचं होतं म्हणून प्रियकराचा कांड
सोमवारी सकाळी 8 वाजता प्रियकर बुरखा घालून मुलीच्या घराच्या छतावर पोहोचला. प्रेयसी त्याला भेटायला गेली होती आणि काही गोष्टींवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तौफिकने प्रेयसीला पाचव्या मजल्यावरून खाली फेकले. त्यानंतर सोमवारी रात्री रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
advertisement
आता प्रेयसीच्या बहिणीने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ती म्हणाली की, तौफिक माझ्या बहिणीला एका महिन्यापासून लग्नासाठी त्रास देत होता. तो माझ्या बहिणीवर एका महिन्यापासून दबाव टाकत होता. तो तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होता. माझ्या बहिणीने नकार दिला होता, पण तो असे काही करेल असे आम्हाला कधी वाटले नव्हते. जेव्हा मी माझ्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने मला ढकलले आणि त्यानंतर नेहाला छतावरून ढकलून दिले.
advertisement
हे ही वाचा : VIDEO : कारच्या कव्हरखाली चाललंय काय? 2 लहान मुलांचा कांड कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांना बसला धक्का!
हे ही वाचा : वृद्ध व्यक्तीचे घाणेरडे VIDEO व्हायरल; तरूण मेहुणीसोबत करतोय रोमान्स, सत्य कळलं तर तुम्हीही व्हाल चकित!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बाॅयफ्रेंड बुरखा घालून भेटायला आला, गर्लफ्रेंडने लग्नास नकार दिला; पुढे जे क्रूर कृत्य झालं ते पाहून चक्रावले पोलीस


