वृद्ध व्यक्तीचे घाणेरडे VIDEO व्हायरल; तरूण मेहुणीसोबत करतोय रोमान्स, सत्य कळलं तर तुम्हीही व्हाल चकित!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
‘थारा दादा हडूमान’ नावाचा एक वृद्ध सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओंमध्ये तो आपल्या 'मेहुणी'सोबत अश्लील कृती करताना दिसतो. हे व्हिडिओ...
आजकाल सोशल मीडियावर 'थारा दादा हडुमान' नावाच्या एका कथित ताऊची खूप चर्चा सुरू आहे. हा वयस्क काका आपल्या तरूण मेहुणीसोबत OYO हॉटेलसारख्या ठिकाणी जाऊन अश्लील अर्थ असलेले व्हिडिओ बनवतो, जे इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहेत. पण धक्कादायक गोष्ट अशी आहे की, हा वयस्क माणूस खरा माणूस नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ने तयार केलेला एक डिजिटल पात्र आहे.
लोक आवर्जुन पाहताहेत व्हिडीओ
ही घटना तेव्हा सुरू झाली, जेव्हा "थारा दादा हडुमान" नावाचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल होऊ लागले. या व्हिडिओमध्ये राजस्थानी वेशभूषेत दिसणारा एक वृद्ध माणूस एका तरुण महिलेसोबत आक्षेपार्ह कृत्य करताना दिसत आहे. ही तरुण महिला त्या वयस्क काकाची मेहुणी असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये ते दोघे OYO हॉटेलच्या बाहेर दिसत आहेत. एका व्हिडिओमध्ये या काकाने मेहुणीला स्पासाठीही नेले होते. या व्हिडिओमुळे हजारो फॉलोअर्स मिळाले आणि लोकांना या या काकाचे "उद्योग" बघायला मजा येऊ लागली.
advertisement
कायदेशीरदृष्ट्या गंभीर चिंतेची बाब
चौकशीतून असे समोर आले आहे की, "थारा दादा हडुमान" ही खरी व्यक्ती नाही. हे AI-जनरेटेड कॅरेक्टर आहे, जे डीपफेक तंत्रज्ञान आणि एआय साधनांचा वापर करून तयार केले आहे. असे पात्र तयार करण्यासाठी जनरेटिव्ह एआयचा वापर केला जातो, जे प्रत्यक्षात दिसणारे चेहरे, आवाज आणि वर्तन डिजिटल पद्धतीने तयार करते. भारतात एआय इन्फ्लुएन्सर्सचा ट्रेंड वाढत आहे, 2024 मध्ये "नैना" सारख्या एआय पात्रांच्या लोकप्रियतेतून हे दिसून येते. पण या प्रकरणात, अश्लील सामग्री तयार करण्यासाठी एआयचा गैरवापर करण्यात आला, जी सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या गंभीर चिंतेची बाब आहे.
advertisement
advertisement
हा तर AI चा मोठा धोका
या प्रकरणामुळे सोशल मीडियावर लोक दोन गटांत विभागले गेले आहेत. काही लोक याला विनोद म्हणून घेत आहेत, तर काही जण याला राजस्थानी संस्कृतीवर हल्ला मानत आहेत. 2024 मध्ये दीपिका पदुकोण आणि रश्मिका मंदान्ना यांसारख्या बॉलिवूड अभिनेत्रींचेही डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामुळे या तंत्रज्ञानाचा धोका समोर आला होता.
advertisement
हे ही वाचा : VIDEO : कारच्या कव्हरखाली चाललंय काय? 2 लहान मुलांचा कांड कॅमेऱ्यात कैद, नेटकऱ्यांनी बसला धक्का!
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/Viral/
वृद्ध व्यक्तीचे घाणेरडे VIDEO व्हायरल; तरूण मेहुणीसोबत करतोय रोमान्स, सत्य कळलं तर तुम्हीही व्हाल चकित!


