"माझ्याशी बोलत जा, नाहीतर..."
आरोपी रमेश शामराव जाधव (वय-36) हा पीडितेच्या ओळखीचा आहे. पीडितेचा पती घरी नसताना तो तिच्याकडे वारंवार येत असे. 'तू मला आवडतेस, माझ्याशी बोलत जा, नाहीतर मी तुझ्या पतीला मारून टाकीन,' अशी धमकी तो तिला देत होता. त्याने पीडितेला एक मोबाईलही भेट दिला आणि सतत फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकत होता.
advertisement
शेळ्यांच्या गोठ्यात केला अत्याचार
25 जुलैच्या रात्री, पीडितेचा पती घरी नसताना, आरोपी रमेश जाधव मुलांना भेटण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. त्यानंतर त्याने तिला घराशेजारील शेळ्यांच्या गोठ्यात बोलावले आणि तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने अजिंठा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी रमेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार धम्मदीप काकडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा : Mumbai: 'ठार करा नाहीतर अंथरुणाला खिळवा', अनैतिक संबंधासाठी पत्नी झाली क्रूर, BFने बरगडी तोडली अन्...
हे ही वाचा : 'पतीचा स्पर्म काऊंट खूपच कमी', गर्भवती करण्यासाठी सासऱ्यासह नातेवाईकांकडून विवाहितेवर अत्याचार