Mumbai: 'ठार करा नाहीतर अंथरुणाला खिळवा', अनैतिक संबंधासाठी पत्नी झाली क्रूर, BFने बरगडी तोडली अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Mumbai: अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे मुंबईत एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई: अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे मुंबईत एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी महिलेच्या प्रियकराने आणि त्याच्या भावाने केलेल्या मारहाणीत पतीचा दुर्दैवी अंत झाला. पण लेकीनं दिलेल्या साक्षीमुळे आरोपी आईचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराच्या भावाला अटक केली आहे. प्रियकर आरोपी फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
भरत अहिरे असं हत्या झालेल्या ४० वर्षीय पतीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी राजश्री आणि तिच्या प्रियकराच्या भावाला अटक केली आहे, तर मुख्य आरोपी प्रियकर चंद्रशेखर फरार आहे. या घटनेतील सर्वात महत्त्वाचे साक्षीदार भरतची १२ वर्षांची मुलगी श्रेया आहे. श्रेयाच्या जबाबामुळे पोलिसांना हत्येचं गूढ उलगडलं सोपं ठरलं आहे.
advertisement
श्रेयाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, १२ जुलै रोजी आई राजश्रीने आपला प्रियकर चंद्रशेखर याला फोन करून घराबाहेर बोलावलं होतं. यावेळी चंद्रशेखर आपल्या भावाला घेऊन घटनास्थळी आला होता. यावेळी वाद झाल्यानंतर प्रियकर चंद्रशेखर आणि त्याच्या भावाने मिळून भरतला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी राजश्री तिथेच उभी राहून 'आणखी मारा' असे म्हणत मारेकऱ्यांना उकसवत होती.
advertisement
एवढंच नव्हे तर भरतला ठार करा किंवा अंथरुणाला खिळवून ठेवा, असंही महिलेनं आपल्या प्रियकराला सांगितलं. यानंतर चवथाळलेल्या आरोपींनी केलेल्या मारहाणीत भरतच्या पोटातील नस फाटली, बरगड्या तुटल्या आणि लिव्हरलाही गंभीर दुखापत झाली. मारहाणीनंतर भरतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यानही पत्नी राजश्री त्याला धमकावत होती. अखेर भरतने रुग्णालयात पोलिसांना दिलेल्या जबाबात पत्नीच्या कृत्याचा खुलासा केला.
advertisement
आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले, 'मृत भरतच्या जबाबानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पत्नी राजश्रीला विरारमधून अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.' या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. भरतच्या आईनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, 'माझी सून राजश्री आणि तिच्या प्रियकराचे गेल्या एक वर्षापासून संबंध होते.'
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 8:33 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: 'ठार करा नाहीतर अंथरुणाला खिळवा', अनैतिक संबंधासाठी पत्नी झाली क्रूर, BFने बरगडी तोडली अन्...