वडिलांनी हत्या केली?
कुसूर येथील कोठे वस्तीवर ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे हे कुटुंबासह राहतात. या ठिकाणी त्यांची मुलगी श्रावणी (वय 8 वर्षे) हिला कोणत्या तरी कारणावरून मारून तिचा मृतदेह दफन केला आहे, अशी माहिती कुसूरच्या पोलीस पाटील महानंदा विठ्ठल पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी याबाबत माहिती मंद्रूप पोलिसांना कळवली. याबाबत माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
advertisement
बारावीत दुसरा क्रमांक पटकावला, सगळे खूश होते, पण दिव्याने उचलले टोकाचे पाऊल!
खून की मृत्यू? तपास सुरू
श्रावणी हिला वडिल ओगसिद्ध कोठे यानेच मारल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली. त्यानुसार मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. श्रावणीचे वडील ओगसिद्ध यांनी श्रावणीला फीट आल्यामुळे तिचा मृत्यू झाला आणि आपण दफन केल्याचे सांगितले. परंतु, शवविच्छेदनानंतरच श्रावणीसोबत नेमकं काय घडलं? तिचा खून झाला की मृत्यू हे पुढे येणार आहे.