बारावीत दुसरा क्रमांक पटकावला, सगळे खूश होते, पण दिव्याने उचलले टोकाचे पाऊल!

Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar: बारावीत शाळेत दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या दिव्या सोनावणे हिनं आत्महत्या केलीये. या घटनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये हळहळ व्यक्त होतेय.

धक्कादायक! बारावीत दुसरा क्रमांक पटकावला, दिव्याची राहत्या घरात आत्महत्या
धक्कादायक! बारावीत दुसरा क्रमांक पटकावला, दिव्याची राहत्या घरात आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुला-मुलींमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अगदी छोट्या छोट्या कारणावरून आत्महत्या केल्याचे प्रकार आपल्या ऐकण्यात असतील. आता छत्रपती संभाजीनगरमधून असाच एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. बारावीत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या मुलीनं आत्मत्या करून आपलं जीवन संपवलंय. दिव्या अतुल सोनवणे असं या विद्यार्थिनीचं नाव आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे.
सोयगाव तालुक्यातील शिवाजीनगर गलवाडा (अ) येथे दिव्या अतुल सोनवणे ही विद्यार्थिनी राहते. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. थोड्या वेळानंतर तिच्या कुटुंबीयांची आरडाओरड झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. दिव्याला खाली उतरवून सोयगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
advertisement
शाळेत दुसरा क्रमांक
दिव्या सोनवणे ही संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात बारावी कला शाखेत शिकत होती. यंदा तिने 74.67 टक्के गुण मिळवून महाविद्यालयात दुसरा क्रमांक पटकावला होता. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयात डिजिटल फ्लॅश लावण्यात आला होता. मात्र आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिव्याने आत्महत्या केल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बारावीत दुसरा क्रमांक पटकावला, सगळे खूश होते, पण दिव्याने उचलले टोकाचे पाऊल!
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement