KDMC Election Results : कल्याण-डोंबिवलीमध्ये मतमोजणीआधीच महायुती सुस्साट... विजयी उमेदवारांची यादी, बहुमताला आणखी कितीची गरज?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकींसाठीचं मतदान गुरूवारी पार पडलं, ज्याची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.
कल्याण : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका निवडणुकींसाठीचं मतदान गुरूवारी पार पडलं, ज्याची मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल, पण या त्याआधीच कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्वाधिक 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, याची घोषणा निवडणूक आयोगाने अधिकृतरित्या केली नसली, तरी या 22 जणांचा विजय निश्चित मानला जात आहे, कारण या उमेदवारांच्याविरोधात विरोधी पक्षामधल्या कुणीच उमेदवार दिला नाही किंवा त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकूण 52.11 टक्के मतदान पार पडलं आहे.
कल्याण-डोंबिवलीचे विजयी उमेदवार
| अ.क्र. | प्रभाग (वार्ड) / वर्ग | उमेदवाराचे पूर्ण नाव | आरक्षण / प्रवर्ग |
| 1 | २६ ब | रंजना मितेश पेणकर | सर्वसाधारण महिला |
| 2 | २६ क | आसावरी केदार नवरे | सर्वसाधारण महिला |
| 3 | २७ अ | मंदा सुभाष पाटील | ओ.बी.सी. महिला |
| 4 | २४ ब | ज्योती पवन पाटील | सर्वसाधारण महिला |
| 5 | १८ अ | रेखा राजन चौधरी | ओ.बी.सी. महिला |
| 6 | २६ अ | मुकुंद (विशू) बाबाजी पेडणेकर | ओ.बी.सी. |
| 7 | २७ ड | महेश बाबुराव पाटील | सर्वसाधारण |
| 8 | १९ क | साई शिवाजी शेलार | सर्वसाधारण |
| 9 | २३ अ | दिपेश पुंडलिक म्हात्रे | ओ.बी.सी. |
| 10 | २३ ड | जयेश पुंडलिक म्हात्रे | सर्वसाधारण |
| 11 | २३ क | हर्षदा हृदयनाथ भोईर | सर्वसाधारण महिला |
| 12 | १९ ब | सुनिता बाबुराव पाटील | सर्वसाधारण महिला |
| 13 | १९ अ | पूजा योगेश म्हात्रे | ओ.बी.सी. महिला |
| 14 | ३० अ | रविना अमर माळी | ओ.बी.सी. महिला |
| 15 | २६ ड | मंदार श्रीकांत हळबे | सर्वसाधारण |
advertisement
शिवसेनेचे विजयी उमेदवार
याशिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, यामध्ये विश्वनाथ राणे, रमेश सुकऱ्या म्हात्रे, वृषाली रणजीत जोशी आणि हर्षल मोरे यांचा समावेश आहे. याशिवाय कल्याण-डोंबिवलीच्या वॉर्ड 30 ड मध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार रामचंद्र गणपत माने यांनी अर्जुन बाबू पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
advertisement
2015 मध्ये कुणाचा विजय?
याआधी कल्याण-डोंबिवलीमध्ये 2015 साली निवडणूक झाली होती, ज्यात शिवसेनेचा 52 जागांवर तर भाजपचा 42 जागांवर विजय झाला होता. याशिवाय मनसेला 9, काँग्रेसला 4, एमआयएमला 4, राष्ट्रवादीला 2 आणि बहुजन समाज पक्षाला एका जागेवर विजय मिळाला होता.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 8:31 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC Election Results : कल्याण-डोंबिवलीमध्ये मतमोजणीआधीच महायुती सुस्साट... विजयी उमेदवारांची यादी, बहुमताला आणखी कितीची गरज?









