बेजबाबदारपणाचा कहर! कारचा दरवाजा उघडला, चूक नसताना दुचाकीस्वाराचा जीव गेला!

Last Updated:

Sambhajinagar Accident: कार चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एकाचा जीव गेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा दरवाजा उघडल्याने विचित्र अपघात घडला.

बेजबाबदारपणाचा कळस! कारचा दरवाजा उघडल्याने अपघात, चूक नसताना गेला दुचाकीस्वाराचा जीव!
बेजबाबदारपणाचा कळस! कारचा दरवाजा उघडल्याने अपघात, चूक नसताना गेला दुचाकीस्वाराचा जीव!
छत्रपती संभाजीनगर : सध्याच्या काळात रस्ते अपघाताचं प्रमाण वाढत आहे. चालकाची चूक असो वा नसो या ना त्या कारणाने अपघाती मृत्यूंचं प्रमाण देखील वाढलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक विचित्र अपघात झाला. एका कारचालकाने बेजबाबदारपणे कारचा दरवाजा उघडला आणि बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा जीव गेला. शहरातील सावरकर चौक परिसरात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होतेय.
छत्रपती संभाजी नगर शहरातील सावरकर चौकात एका बेजबाबदार चालकाने थेट कारचा दरवाजा उघडला. त्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात 19 मे रोजी दुपारी 12:30 वाजता घडला. अपघातात 68 वर्षीय अशोक लक्ष्मीनारायण अमृते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना 21 मे रोजी  त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
अशोक अमृते हे पत्नीसमवेत नवजीवन कॉलनीत राहत होते. एका कारचालकाने (एमएच 20 सीएच 3423) बेजबाबदार पणे रस्त्यावरच आपली चारचाकी उभी केली. तसेच मागेपुढे न बघता कारचा दरवाजा अचानक उघडला. दरवाजा अचानक उघडल्याने मागून येत असलेल्या अशोक यांची दुचाकी थेट दरवाजावर जाऊन आदळली. या धडकेत ते रस्त्यावर कोसळून डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
advertisement
अपघातानंतर कारचालक व स्थानिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान 21 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशोक अमृते हे बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी होते. त्यांची मुलगी परदेशात राहते. या घटनेनंतर अशोक यांचे पुतणे प्राध्यापक मनिष अमृते यांनी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भोवनेश्वर रामदास पाटील (रा. बजाजनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक रमेश कंदे करत आहेत.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बेजबाबदारपणाचा कहर! कारचा दरवाजा उघडला, चूक नसताना दुचाकीस्वाराचा जीव गेला!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement