Weather Alert: 16 जानेवारीला हवामानात मोठे बदल, थंडी वाढणार की अवकाळी झोडपणार? पाहा अपडेट

Last Updated:
Weather Alert: जानेवारीच्या मध्यावर महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. शुक्रवारी थंडीचा जोर काहीसा ओसरणार असला तरी हवामान विभागाने महत्त्वाचा अलर्ट दिला आहे.
1/4
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हवामान मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 17 अंशांच्या आसपास राहील. सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेत उकाडा वाढल्याने दमट वातावरण अनुभवायला मिळू शकते. ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागातही साधारण अशीच स्थिती राहणार असून पुढील काही दिवस तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही.
6 मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हवामान मुख्यतः निरभ्र ते अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून किमान तापमान 17 अंशांच्या आसपास राहील. सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवेल, मात्र दुपारच्या वेळेत उकाडा वाढल्याने दमट वातावरण अनुभवायला मिळू शकते. ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागातही साधारण अशीच स्थिती राहणार असून पुढील काही दिवस तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही.
advertisement
2/4
पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात पहाटे थंडी जाणवेल, मात्र दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी उष्णता वाढण्याची शक्यता आहे. पुणे शहरात सकाळच्या वेळेत हलकं धुकं पडू शकतं, तर आकाश अंशतः निरभ्र राहील. येथे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 14 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून, मागील दिवसांच्या तुलनेत थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचं जाणवेल. मात्र दिवस-रात्र तापमानातील फरक कायम राहणार आहे.

3/4
मराठवाड्यात सकाळी थंड वातावरण राहील, त्यानंतर तापमानात वाढ होणार असून आकाश मुख्यतः निरभ्र राहील. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूर भागात कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअसदरम्यान, तर किमान तापमान 13 ते 14 अंशांच्या आसपास राहणार आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा काहीसा कमी झालेला आहे. विदर्भातही तापमानात चढ-उतार सुरू असून नागपूर, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत सकाळी गारवा जाणवेल. नागपूरमध्ये कमाल तापमान सुमारे 30 अंश आणि किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

4/4
एकंदरीत, 16 जानेवारी रोजी महाराष्ट्रात ढगाळ ते निरभ्र हवामान राहणार असून थंडीचा जोर पूर्वीइतका तीव्र राहणार नाही. दुपारच्या वेळेत उष्णता वाढण्याची शक्यता असली, तरी सकाळी आणि रात्री गारवा जाणवेल. पुढील काही दिवस तापमानात चढ-उतार सुरू राहणार असून बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

Dhule Election: भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आरोपाने खळबळ
भाजप कार्यकर्त्यांचा धिंगाणा, शिवीगाळ केली, ईव्हीएम मशीन फोडली, शिंदे गटाच्या आर
  • मतदान केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • प्राथमिक विद्यामंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या मतदान यंत्राची तोडफोड

  • भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

View All
advertisement