TRENDING:

गोंदिया हादरलं! लेकानेच हातोड्याने फोडलं बापाचं डोकं; दुकानात लपवला मृतदेह, कारण धक्कादायक

Last Updated:

राकेश कांबळे याने आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला. यानंतर दुकान बंद करून निघून गेला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गोंदिया (रवी सपाटे, प्रतिनिधी) : आई-वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्त्वाचे असतात. हे नातं प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं असतं. मात्र, कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे (वय 48) यांना दारू पिण्याची सवय होती. मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल यांचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं.
आरोपी राकेश कांबळे
आरोपी राकेश कांबळे
advertisement

या सगळ्याला कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळे याने आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला. यानंतर दुकान बंद करून निघून गेला. यानंतर वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करून दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली, त्यावेळी राकेशवर संशय आला आणि स्वान पथकामुळे अखेर घटनेचा खुलासा झाला .

advertisement

बायकोसोबतच्या भांडणानंतर गर्लफ्रेंडच्या घरी गेला तरुण; रात्री तिथेच झोपला अन् परत उठलाच नाही

यानंतर राकेशनी पूर्ण घटना सांगून आपल्या वडिलांना आपण स्वतः संपवलं असल्याचं तसंच त्यांचा मृतदेह दुकानात असल्याचं सांगितलं. त्यानंतर दुकानात तपासणी केली असता दुकानामध्ये रामलाल यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला दिसला. त्यांच्या डोक्यावर हातोड्याने मारहाण करून राकेश यानी आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना उघडकीस आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पुन्हा एकदा वडिलांच्या व्यसनापायी एका मुलाने आपल्या वडिलांचा खून केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावात घडली. राकेश याला अटक करण्यात आली असून या घटनेचा तपास गोंदिया ग्रामीण पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/क्राइम/
गोंदिया हादरलं! लेकानेच हातोड्याने फोडलं बापाचं डोकं; दुकानात लपवला मृतदेह, कारण धक्कादायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल