TRENDING:

12 व्या वर्षी लैंगिक अत्याचार, नंतर गायब झाली मुलगी, त्या नराधमाला शिक्षा द्यायला 10 वर्षांनी खुद्द 'निर्भया' आली

Last Updated:

Rape case : एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर ही मुलगी गायब होती. तब्बल 10 वर्षे या प्रकरणावर सुनावणी सुरू होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चेन्नई : मुलींवर लैंगिक अत्याचाराची प्रकरणं काही कमी होत नाही. तामिळनाडूतील नुकतंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे. 10 वर्षांपूर्वी झालेलं हे प्रकरण.  एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर ही मुलगी गायब होती. तब्बल 10 वर्षे या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. 10 वर्षांनी गायब झालेली मुलगी वयाच्या 22 व्या वर्षी तिच्यावर बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला शिक्षा द्यायला स्वत: कोर्टात आली.
News18
News18
advertisement

2015 सालची ही घटना. 12 वर्षांची ही मुलगी चेन्नईत आपल्या कुटुंबासह एका भाड्याच्या घरात राहत होती. घराच्या मालकाच्या 41 वर्षांच्या जावयाची तिच्यावर वाईट नजर होती. 7 फेब्रुवारी 2015 रोजी त्याने तिचं अपहरण केलं. चेन्नईपासून जवळपास 400 किलोमीटर दूर असलेल्या डिंडिगुलला तो तिला घेऊन गेला. तिथं एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नंतर पळून गेला.

advertisement

10 वेळा साप चावला, मृत्यूनंतर पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये दिसलं असं काही उडाली खळबळ

इकडे चेन्नईत मुलीच्या कुटुंबाने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात केली. दोन दिवसानंतर मुलगी कशीबशी आपल्या घरी परत आली आणि तिने आपल्या आईला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तिच्या आईने तिला आपल्यासोबत नेऊन पोलिसात तक्रार केली. पण यानंतर या कुटुंबाने चेन्नई सोडलं. मुलगी आपल्या आईसोबत गावी राहू लागली. आरोपी तिच्यामागोमाग तिथंही पोहोचला आणि चेन्नईत आल्यास किंवा कोर्टात पोहोचून साक्ष दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मायलेकींनी ते ठिकाणसुद्धा सोडलं. त्यानंतर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दोघी मजुरी करू लागल्या.

advertisement

चेन्नईत याप्रकरणी केस सुरूच होती. दुसरीकडे राज्यातील महिला पोलीस या मायलेकींचा शोध घेत होत्या. अखेर गेल्या वर्षी त्या दोघी सापडल्या.

सगळे गाढ झोपेत होते, अचानक आला मोठा आवाज, नागपुरातील घटनेने अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सरकारी वकील अनिता यांनी सांगितलं की, आई आणि मुलीला पूर्ण सुरक्षेसह चेन्नईत आणलं आणि कोर्टात हजर केलं. आता ती मुलगी 22 वर्षांची झाली आहे. आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगायला सुरुवातीला ती घाबरत होती, पण नंतर तिनं सगळं काही सांगितलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आपल्यासोबत काय, कसं घडलं? सगळं सगळं तिनं कोर्टात सांगितलं. पीडितेने नराधमाला ओळखलं आणि तिच्या साक्षीनुसार आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मराठी बातम्या/क्राइम/
12 व्या वर्षी लैंगिक अत्याचार, नंतर गायब झाली मुलगी, त्या नराधमाला शिक्षा द्यायला 10 वर्षांनी खुद्द 'निर्भया' आली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल