10 वेळा साप चावला, मृत्यूनंतर पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये दिसलं असं काही उडाली खळबळ
- Published by:Priya Lad
Last Updated:
Snake bite : असं म्हटलं जात होतं की साप चावल्यानंतर साप रात्रभर पलंगाखाली बसला होता आणि त्याला काढण्याचा प्रयत्न करूनही तो त्याच्या जागेवरून हलला नाही.
लखनऊ : साप चावल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. आता असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका 25 वर्षीय व्यक्तीला एकदा-दोनदा नव्हे तर तब्बल 10 वेळा साप चावला. पण पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये आता वेगळाच खुलासा झाला आहे. आता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.
उत्तर प्रदेशच्या मेरठमधील अकबरपूर सादत गावातील रहिवासी 25 वर्षांचा अमित उर्फ मिक्की, त्याची पत्नी रविता आणि मुलांसह राहत होता. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, अमित रविवारी रात्री 10 वाजता घरी आला आणि झोपला तो सकाळी पुन्हा उठलाच नाही. पाच वाजता ते अमितला उठवायला गेले तेव्हा त्याच्या शरीराच्या खाली एक साप आढळला. कुटुंबाने असा दावा केला की सापाने अमितला 10 वेळा सापाने दंश केला होता. अमितच्या शरीरावर साप चावण्याच्या खुणा होत्या.
advertisement
कुटुंबीयांनी त्याला बुलंदशहर जिल्ह्यातील गुलावती येथील एका डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. असंही म्हटलं जात होतं की चावल्यानंतर, साप रात्रभर पलंगाखाली बसला होता आणि त्याला काढण्याचा प्रयत्न करूनही तो त्याच्या जागेवरून हलला नाही. एका सर्पमित्राने त्या सापाला पकडलं आणि तो एका बॉक्समध्ये बंद करून वन विभागाच्या पथकाला देण्यात आला.
advertisement
शवविच्छेदनानंतर पोलीस स्टेशनच्या प्रमुख इंदू वर्मा यांनी अमितच्या कुटुंबाला फोन केला. गावकऱ्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला होता. ते म्हणाले की मृत्यू साप चावल्याने झाला नाही. एसपी ग्रामीण राकेश कुमार मिश्रा म्हणाले, 'शवविच्छेदनात साप चावण्याच्या खुणांव्यतिरिक्त, शरीरावर काही जखमांच्या खुणादेखील आढळल्या. व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचं म्हटलं आहे. पुढील तपास सुरू आहे.
advertisement
शवविच्छेदन अहवालात सापाच्या सूडाची कहाणी खोटी असल्याचं आढळून आलं आहे. अमितचा मृत्यू साप चावल्याने झाला नाही तर गुदमरल्याने झाला. आता पत्नीसह अनेकांवर हत्येचा संशय अधिकच बळावला आहे.
Location :
Delhi
First Published :
April 17, 2025 11:27 AM IST
मराठी बातम्या/Viral/
10 वेळा साप चावला, मृत्यूनंतर पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये दिसलं असं काही उडाली खळबळ