विळ्याने सपासप वार
पोलिसांनी सांगितले की, कोइम्बतूरमधील एका खाजगी कंपनीत काम करणारी 28 वर्षीय महिला तिच्या पतीशी झालेल्या भांडणानंतर एका खाजगी महिला वसतिगृहात राहत होती. ही महिला तिरुनेलवेली जिल्ह्यातील तिरुवाई येथील रहिवासी होती. रविवारी दुपारी तिचा नवरा एस. बालामुरुगन तिला भेटण्याच्या बहाण्याने हॉस्टेलमध्ये आला. दोघांमधील वाद वाढत असताना त्याने तिला विळ्याने सपासप वार केले.
advertisement
विश्वासघाताची किंमत मृत्यू
श्री प्रियाला तीन मुले होती. वैयक्तिक कारणांमुळे श्री प्रिया कोइम्बतूरमधील एका महिला वसतिगृहात राहत होती. नवऱ्याने केलेल्या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्याने तिथून पळून जाणं पसंत केलं नाही. नवऱ्याने रक्ताळलेल्या मृतदेहासोबत सेल्फी काढला अन् व्हॉट्स अप स्टेटसला अपलोड केला. त्यावर 'विश्वासघाताची किंमत मृत्यू', असं बालामुरुगनने लिहिलं होतं.
बालामुरुगनला अटक
दरम्यान, बालामुरुगननंतर मृतदेहासमोर तसंच बसून राहिला. पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. रत्नापुरी पोलिसांनी बालामुरुगनला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
