सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच राधिका यादवचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती इनाम-उल-हक नावाच्या तरुणासोबत बाईकवर फिरताना दिसली होती. हा व्हिडिओ यूट्यूब चॅनेलवरही अपलोड करण्यात आला आहे. तसेच विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर देखील शेअर करण्यात आला आहे. सूत्रांचा दावा आहे की, आरोपी दीपक यादवला हा व्हिडीओ अजिबात आवडला नव्हता. याच व्हिडीओमुळे त्याने आपल्या मुलीचा जीव घेतल्याचं सांगितलं जातंय.
advertisement
पोलिसांचा संशय आहे की, राधिका सोशल मीडियावर सक्रिय राहते, रील बनवते आणि सार्वजनिकरित्या मित्रांसोबत व्हिडीओ शेअर करते, या सगळ्यामुळे तिचे वडील नाराज होते. याच कारणातून त्यांनी राधिकाची हत्या केल्याचं सांगितलं जातंय. सध्या पोलिसांनी कौटुंबिक तणाव आणि आर्थिक असुरक्षितता हे हत्येमागील मुख्य कारण असल्याचे सांगितले आहे, परंतु या व्हायरल व्हिडिओ आणि रीलबद्दलही चौकशी केली जात आहे.
वडिलांनी कबूल केले
राधिकाच्या वडिलांनी त्यांच्या मुलीवर पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या तिला लागल्या. पोलिसांना दिलेल्या जबाबात वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीची अकादमी खूप कमाई करत होती. यामुळे वजिराबादमधील लोक त्यांना टोमणे मारायचे की ते त्यांच्या मुलीचे कमाई खात आहेत. यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला अकादमीत जाण्यापासून रोखले. पण तिने ऐकले नाही आणि नंतर त्यांनी तिला मारले.