सीआयएसएफ (CISF) च्या जवानांनी अबू धाबीहून आलेल्या दोन प्रवाशांना ताब्यात घेतलं त्यांच्या सामानातून तब्बल 1.4 कोटी रुपयांच्या किंमतीचे प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यात अनेक बॅन केलेले ड्रोन, प्रीमियम स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक अॅक्सेसरीजचा समावेश आहे.
अहवालानुसार, विमानतळावर दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीआयएसएफ जवानांनी तत्काळ त्यांची तपासणी केली. डोमेस्टिक एक्झिट गेटवर एक्स-रे मशीनद्वारे सामान स्कॅन करण्यात आलं असता मोठ्या प्रमाणावर अनडिक्लेयर्ड इलेक्ट्रॉनिक वस्तू आढळल्या. यामध्ये अशा अनेक ड्रोनचा समावेश होता, ज्यांच्या आयातीवर भारतात प्रतिबंध आहे. चौकशीत या दोन्ही प्रवाशांकडे खरेदीची कागदपत्रं किंवा अधिकृत आयात परवानगी नव्हती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन सीमाशुल्क विभागाकडे सोपवण्यात आलं.
advertisement
सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मते, लाल किल्ला स्फोटानंतर अशा प्रकारची पकड अत्यंत गंभीर मानली जात आहे. तपास यंत्रणा आता या ड्रोनचा हेतू काय होता याचा शोध घेत आहेत. हा फक्त कस्टम्सपासून बचाव करण्याचा प्रकार आहे का, की यामागे काही मोठं षड्यंत्र दडलेलं आहे?
स्रोतांच्या माहितीनुसार, अशा महागड्या आणि अत्याधुनिक उपकरणांचा देशात गुप्तपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न हा केवळ तस्करी नसून जासूसी किंवा दहशतवादी कारवायांशी संबंधित असू शकतो. राजधानीपासून सीमारेषांपर्यंत सुरक्षा कडक केली असतानाच अशी घटना समोर येणं म्हणजे शत्रूराष्ट्रं किंवा दहशतवादी गट अजूनही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले डाव साधत असल्याचं स्पष्ट संकेत आहेत.
