पीलीभीत, 1 सप्टेंबर : दिवसागणिक अत्याचाराच्या एवढ्या बातम्या समोर येतात की आता मुली, स्त्रिया घरात तरी सुरक्षित आहेत का? असा सवाल निर्माण होतो. आजही मोठ्या भावाने लहान भावाच्या बायकोवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्याचा मेहुणाही यात सामील होता. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यातील अमरिया भागात ही अमानुष घटना घडली. पीडितेचा नवरा परदेशात गेल्याचा गैरफायदा या 2 नराधमांनी घेतला. तर, याविरोधात आवाज उठवताच तिला बेदम मारहाण करण्यात आली.
advertisement
पावसाळ्यात त्वचेला खाज सुटली आहे? करा 'हा' उपाय
पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचं गुरविंदर नामक व्यक्तीशी पंजाबी पद्धतीनुसार लग्न झालं होतं. लग्नाच्या काही महिन्यांतच तिचा नवरा इटलीला गेला. तेव्हापासून ती घरात एकटीच राहत होती. 28 ऑगस्टला तिचा मोठा दीर अमरजीत सिंह आणि त्याच्या नवाबगंज भागात राहणाऱ्या मेहुण्याने तिच्यावर जबरदस्ती केली. तिने याबाबत सासू आणि जावेला सांगितलं, मात्र त्यांनी तिचं काहीही ऐकून घेतलं नाही. उलट असं बोलल्यामुळे घरातल्या सर्वांनी मिळून तिला मारहाण केली.
थरार! बायकोसोबत भांडण, विकृत जावयाचा सासरवाडीत अंदाधुंद गोळीबार
या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी अमरजीत आणि त्याच्या मेहुण्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, पीडितेने याप्रकरणी रितसर लेखी तक्रार दाखल केली असून याविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली आहे.
