लग्नपत्रिकेतच लपलेला सायबर सापळा!
राजकोट जिल्ह्यातील कोलिथड गावातील रियाझ भाई गाला यांची गोष्ट ऐका. 14 फेब्रुवारीला त्यांना त्यांच्या नातेवाईक ईशान भाई यांचा फोनवर मेसेज आला. म्हणाले, “माझ्या लग्नाला नक्की या.” त्यासोबत एक PDF फाईलही होती. रियाझ भाईंना आनंद झाला, त्यांनी विचार केला लग्नाचं कार्ड पाहूया, पण हे कार्ड खरं तर सायबर ठगांनी रचलेला सापळा होता. त्यांनी फाईल डाउनलोड करताच, हॅकर्सनी त्यांच्या फोनचा ताबा घेतला. आधी फक्त 1 रुपया कापला गेला, मग हळूहळू पूर्ण 75,000 रुपये गायब झाले. त्यांना काही कळायच्या आत, त्यांच्या कष्टाचे पैसे दुसऱ्याच्या खिशात गेले होते.
advertisement
शेतीत राबणारेही ठरले बळी!
रियाझ भाई एकटे नव्हते. कोलिथड गावातील शेतकरी शैलेश भाई सावळिया यांच्यासोबतही असंच घडलं. दिवसभर शेतात राबणाऱ्या शैलेश भाईंनाही असंच लग्नाचं आमंत्रण आलं. त्यांनीही कोणताही संशय न घेता फाईल डाउनलोड केली आणि काही क्षणात त्यांच्या खात्यातून 24,000 रुपये गायब झाले.
आता तुम्हाला वाटत असेल की, हे फक्त एका गावापुरतं आहे. नाही भाऊ! राजकोटच्या वेजागम गावात एकाच वेळी 10 लोकांचे फोन हॅक झाले. गावचे सरपंच जीतू भाई यांचा फोन आधी हॅक झाला आणि नंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचे फोनही हॅक झाले. बरं झालं त्यांनी लगेच बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खाती बंद केली, नाहीतर तिथेही लाखो रुपयांचं नुकसान झालं असतं.
हे ही वाचा : अपघात की घातपात? 4 दिवसांत 2 घटना, ठाण्यात तरुणींचा धावत्या रेल्वेतून पडून होतोय संशयास्पद मृत्यू
हे ही वाचा : 'कानून के हात...' तब्बल 16 वर्षांपूर्वी सोनं गेलं होतं चोरीला, 2025 मध्ये पोलिसांनी आणलं शोधून!
