हो कारण आता ठग्यांना लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि त्यांच्या फोनमधील डेटा आणि पैसे चोरण्यासाठी नवीन आणि आधुनिक पद्धत वापरायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये काही लोकांची फसवणूक झाल्याचं देखील समोर आलं आहे. या स्कॅममध्ये लोकांच्या भावना आणि सामाजिक परंपरा वापरून त्यांच्या फोनवर, आणि त्यातूनच थेट बँक अकाउंटवर हल्ला केला जातो.
कसं चालतं हे WhatsApp Wedding Invitation Scam?
advertisement
एका अनोळखी नंबरवरून तुमच्या WhatsApp वर अचानक एक सुंदर डिझाइन केलेला लग्नाचा कार्ड येतं.
सोबत मेसेज “कृपया आमच्या लग्नाला नक्की या… कार्ड ओपन करा” किंवा “Family invitation आहे, जरूर उपस्थित रहा” असा मेसेज येतो. तेव्हा सावध व्हा
असा मेसेज वाचून कोणालाही सहज वाटेल की कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीचं आमंत्रण आलंय. त्यामुळे लोक लगेच तो PDF किंवा लिंक ओपन करतात. इथंच सगळा खेळ सुरू होतो. कारण त्या लिंकसोबत येतं मालवेअर, जे दिसतही नाही आणि आवाजही करत नाही. पण तुमच्या फोनमध्ये बसताक्षणी ते सुरू करतं तुमची माहिती चोरणं.
एका क्लिकने काय काय होऊ शकतं?
तुमचे OTP आणि पासवर्ड हॅकर्सपर्यंत पोहोचतात
बँकिंग अॅपची माहिती चोरी होते
फोनचं पूर्ण नियंत्रण ठगांच्या हाती जातं आणि काही मिनिटांतच तुमचं बँक अकाउंट रिकामं होऊ शकतं
म्हणजे साधं लग्नाचं कार्ड वाटलेलं हे आमंत्रण प्रत्यक्षात बँक बॅलन्स उडवणारं जाळं निघतं.
हा स्कॅम एवढा वाढतोय का?
कारण लग्नाचं कार्ड बघितलं की आपण विचार करतच नाही. आपण थेट क्लिक करतो मग ते कोणी ओळखीच्या व्यक्तीने पाठवलेलं असोत किंवा नाही.
याच भावनेचा फायदा ठग घेतात. कार्ड इतकं आकर्षक आणि खरेखुरे वाटेल असं बनवलं जातं की सामान्य माणूस ते नकळत उघडतोच.
कसा वाचाल या WhatsApp Invitation Scam पासून?
अनोळखी नंबरवरून आलेलं कोणतंच PDF, लिंक किंवा वेबसाइट उघडू नका
ओळखीचं नाव दिसलं तरी फोन करून खात्री करा
फोनमध्ये अँटीव्हायरस आणि सुरक्षा सेटिंग्ज अपडेटेड ठेवा
कोणालाही OTP, UPI PIN, पासवर्ड देऊ नका
चुकून लिंक उघडली तर? तात्काळ करा हे उपाय
सर्व बँकिंग पासवर्ड बदलून टाका
UPI PIN, ईमेल पासवर्ड अपडेट करा
फोनची सुरक्षा तपासणी करून घ्या आणि काही संशय वाटत असेल तर लगेच सायबर हेल्पलाइन 1930 वर संपर्क करा
WhatsApp वर आलेलं लग्नाचं कार्ड हे आता “इन्विटेशन” नसून स्कॅमचं नवं हत्यार बनलंय. एक चूक… एक क्लिक… आणि संपूर्ण बँक अकाउंट खाली. त्यामुळे आता सावध व्हा.
