कर्नाटकच्या रहिवासी असणाऱ्या या महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने ५० वर्षीय पतीची निर्घृण हत्या केली. गुन्हा करण्यापूर्वी सुमंगलाने तिच्या पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि नंतर काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत अर्धमेल्या अवस्थेत पती गेल्यानंतर सुमंगलाने पतीच्या गळ्यावर लाथ मारून जोरदार दाबले. पतीची हत्या केल्यानंतर तिने मृतदेह एका पोत्यात टाकला आणि घरापासून दूर फेकून दिला.
advertisement
फार्महाऊसमध्ये रक्तरंजित खेळ
कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २४ जून रोजी घडली. शंकरमूर्ती असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. तो तुमकुरू जिल्ह्यातील टिपतूर तालुक्यातील कडाशेट्टीहल्ली गावात एका फार्महाऊसमध्ये एकटाच राहत होता. त्याची पत्नी सुमंगला ही मुलींच्या हॉस्टेल स्वयंपाकी म्हणून काम करते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेचे कर्दालुसंते गावातील रहिवासी नागराजूवर प्रेम होते. दोघांचेही बऱ्याच काळापासून अवैध संबंध होते. पती शंकरमूर्तीला याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सुमंगला आणि तिच्या प्रियकराने शंकरमूर्तीला मारण्याचा कट रचला.
घटनेच्या दिवशी सुमंगलाने प्रथम तिच्या पतीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली, नंतर काठीने त्याला बेदम मारहाण केली. शेवटी तिने त्याच्या गळ्यावर पाय ठेवून त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरला आणि सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन भागातील शेतातील विहिरीत फेकून दिला. सुरुवातीला हा खटला शंकरमूर्तीच्या बेपत्ता होण्याबद्दल होता. दरम्यान, पोलिसांना फार्महाऊसमधील पलंगावर मिरची पावडर आणि झटापट झाल्याच्या खुणा आढळल्या, ज्यामुळे संशय निर्माण झाला. यानंतर पोलिसांनी सुमंगलाची चौकशी केली असता त्यांना आणखी संशय बळावला. तिचे कॉल डिटेल्स तपासले असता पोलिसांना हा हत्येचा कट असल्याचं समजलं. यानंतर आरोपी सुमंगलाने हत्येची कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास कर्नाटक पोलीस करत आहेत.