TRENDING:

Kalyan Crime: सूनेच्या रक्ताचा एक थेंब अन् सासूचं कृत्य उघड, सिनेमाला लाजवेल अशा कल्याणमध्ये घटना

Last Updated:

Kalyan Crime: कल्याण पूर्वेमध्ये पैशांच्या वादाने झालेल्या घटनेचा उलगडा पोलिसांना लागला आहे. महात्मा फुले पोलिसांनी आपल्या एका नजरेत खुनाचा शोध लावला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण पूर्वेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सासूने आपल्या मित्राच्या मदतीने सुनेची हत्या केली आहे. दोघांनीही हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी एक पुरावा राहिला, त्याच मदतीने पोलिसांनी गुन्हेगारांचा छडा लावला आहे. कर्पेवाडीमधील जिम्मीबाग परिसरामध्ये आर्थिक आणि कौटुंबिक वादातून झालेल्या हत्येचा रक्ताच्या थेंबामुळे पोलिसांनी हत्येचा उलगडा केला आहे. घरात मिळालेल्या पुराव्यामुळे महात्मा फुले पोलिसांनी लताबाई गांगुर्डे (60) आणि जगदीश म्हात्रे (67) या दोघांनाही अटक केली. हत्येच्या 24 तासांतच पोलि‍सांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
News18
News18
advertisement

नेमकं प्रकरण काय?

भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या विलास गांगुर्डे यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नीला 10 लाखांची ग्रॅच्युईटी रक्कम मिळाली. तसेच, मयत पतीच्या जागेवर आपल्याला नातवाला तेथे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करू, सासू लक्ष्मीबाईचे मत होते. मात्र त्याऐवजी सूनेने स्वत:साठी रेल्वेत अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केला होता. यावरून आपल्या मुलाच्या पश्चात त्याच्या ग्रॅच्युईटीतील काही रक्कम देण्यासाठी सून नकार देत होती. या रागातून सासू लक्ष्मीबाईने आपल्या मित्राच्या मदतीने 1 जानेवारी 2026 रोजी कल्याण पूर्वेच्या जिम्मीबाग, कर्पेवाडी भागात राहत्या घरात सुनेचा खून केला. या खुनाचा उलगडा महात्मा फुले चौक पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत केला.

advertisement

एक चूक पडली महागात

वालधुनी रेल्वे पुलाखाली एका अज्ञात महिलेचा खून करून तिला बेवारस स्थितीत टाकून देण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी महात्मा फुले पोलिसांना शुक्रवारी दिली. पोलिसांनी तात्काळ तपास चक्रांना वेग दिला. घटनेचा तपास सुरू असताना लताने आपल्या सुनेचा फोटो घेऊनच फुले पोलिस चौकी गाठली. 1 जानेवारी 2026 च्या रात्री आठ वाजल्यापासून सून रूपाली ही रामबागमधल्या घरातून गायब आहे. अजूनही ती घरी परतली नाही. रूपालीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि मनगटावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे पोलिसांना तिच्या मृतदेहाची ओळख पटवणे मोठं आव्हान होतं. फुले पोलिसांनी लताबाईला आपल्या बेपत्ता सुनेचा फोटो दाखवताच तिने पोलीस स्टेशनमध्येच टाहो फोडला.

advertisement

पुरावे नष्ट करूनही गुन्हा पकडला

तीच आपली सून असल्याचे सांगत लताबाईने पोलिस ठाण्यातच आक्रोश केला. पण पोलिसांचा संशय लताबाईकडे अधिक बळावला. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने जिम्मीबागेतल्या घराची झडती घेतली. रूपालीच्या घराची लताबाई आणि तिच्या मित्राने साफसफाई केली. पण तरीही फरशीवर आढळलेले रक्ताचे थेंब पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. तपासणीवेळी हे रक्त रूपालीचे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी लताबाईची कसून चौकशी केली असता तिने तिचा मित्र जगदीश म्हात्रेने ही हत्या केल्याचे पोलि‍सांना सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रक्ताने माखलेले कपडे धुवून टाकले आणि घराची स्वच्छता केली. त्यानंतर, रात्री उशिरा लताबाई आणि जगदीशने बाईकवरून रूपालीचा मृतदेह वालधुनी येथील पुलाखाली नेऊन फेकून दिल्याचे तपासात उघड झाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, उपायुक्त अतुल झेंडे, एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलिरामसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक, सोपान नांगरे यांच्यासह पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला.

मराठी बातम्या/क्राइम/
Kalyan Crime: सूनेच्या रक्ताचा एक थेंब अन् सासूचं कृत्य उघड, सिनेमाला लाजवेल अशा कल्याणमध्ये घटना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल