शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधी चौकातील कृष्णापुरी कॉलनी नंदलाल टोला येथे एक चोर दिवसाढवळ्या चोरी करण्यासाठी घरात शिरला होता. यावेळी रहिवासी रमेश कुमार सिंग यांची 45 वर्षीय पत्नी मीना देवी यांची नजर चोरावर पडली. त्यावेळी मीनादेवी यांना पाहताच चोर आक्रमक होऊन त्यांच्यावर धावून गेला आणि महिलेच्या गळ्यावर तीन चार वार केले. मात्र महिलेने चोराला पकडले आणि त्याला मारहाण केली पण चोर महिलेच्या तावडीतून कसा बसा पळून गेला. आरडाओरडा ऐकून घरातील इतर सदस्यही तेथे पोहोचले आणि त्यांनी गंभीर जखमी महिलेला छपरा येथील स्थानिक रुग्णालयात नेले.
advertisement
भारताच्या दिव्यांग पॉवर लिफ्टरवर आली वाईट वेळ, उदरनिर्वाहासाठी करावं लागतंय 'हे' काम
घरात चोर शिरला तेव्हा मीना देवी घरात एकट्याच होत्या. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. सध्या पोलीस सादर घटनेचा तपस करीत असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. मात्र चोराशी दोन हात करणाऱ्या मीना देवी यांचे देखील त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल कौतुक करण्यात येत आहे.