भारताच्या दिव्यांग पॉवर लिफ्टरवर आली वाईट वेळ, उदरनिर्वाहासाठी करावं लागतंय 'हे' काम
- Published by:Pooja Pawar
- local18
Last Updated:
अनेक खेळाडूंना त्यांच्या प्रावीण्यासाठी गौरविण्यात आले परंतु अनेक खेळाडू असेही आहेत जे लोकांच्या विस्मृतीत गेले आणि ते आजही जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.
लुधियाना, 30 जुलै : भारताच्या अनेक दिव्यांग खेळाडूंनी जागतिक स्तरावर विविध खेळात भाग घेऊन देशाचे नाव उंचावले आहे. यापैकी अनेक खेळाडूंना त्यांच्या प्रावीण्यासाठी गौरविण्यात आले परंतु अनेक खेळाडू असेही आहेत जे लोकांच्या विस्मृतीत गेले आणि ते आजही जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.
एकेकाळी पॉवर लिफ्टिंगमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणारे पंजाबमधील दिव्यांग खेळाडू मनराज सिंगची, आज कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी टायर पंक्चर काढण्याचे काम करीत आहेत. पंजाब ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनराज यांनी शेकडो पदक जिंकली आहेत. सध्या ते लुधियानापासून 20 किमी अंतरावर असलेल्या रायपूर बेट या छोट्याशा गावात आपल्या कुटुंबासह राहतात.
advertisement
तरूणांनी ड्रग्जऐवजी खेळाकडे लक्ष द्यावे, असा प्रचार सरकार करत असताना दिव्यांग खेळाडूंसाठी सरकार काहीही करत नसल्याचे मनराज यांनी सांगितले. अपंग खेळाडू असूनही मनराज यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पॉवर लिफ्टिंगमध्ये शेकडो विजय मिळवले आहेत. मात्र, त्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळालेले नाही. पदक जिंकून आले असताना सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांच्या स्वागतासाठी आला नाही.
advertisement
देशासाठी आणि राज्यासाठी चांगला खेळ दाखवणाऱ्या खेळाडूंना सरकारने आर्थिक मदत करावी, जेणेकरून तरुणांना चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखता येईल असे मनराज सिंग यांनी सांगितले.
Location :
Ludhiana,Ludhiana,Punjab
First Published :
July 30, 2023 5:34 PM IST
मराठी बातम्या/देश/
भारताच्या दिव्यांग पॉवर लिफ्टरवर आली वाईट वेळ, उदरनिर्वाहासाठी करावं लागतंय 'हे' काम