TRENDING:

तरुणीने दिले लग्नाला होकार, गोड बोलून पैसेही मागू लागली, शेवटी तरुणासोबत घडलं मोठं कांड

Last Updated:

marriage scam - प्रदीप कुमारचे कुटुंबीय लग्नासाठी मुलगी शोधत होते. यादरम्यान, लॉकडाऊनमध्ये त्यांना मोठा फटका बसला. एका ठिकाणी त्याचे लग्न जोडले गेले होते. मात्र, ते मोडले गेले. यानंतर प्रदीपने वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिन्नू वाल्मिकी, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

बहराइच : गेल्या काही दिवसात लग्नाचे आमिष देत फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामध्ये आर्थिक फसवणूक तसेच शारीरिक संबंध ठेवल्याचेही प्रकार समोर आले आहेत. यातच एका तरुणीने लग्नाचे आमिष देत तरुणाची मोठी फसवणूक केली.

काय आहे संपूर्ण घटना -

प्रदीप कुमार नावाच्या तरुणासोबत ही घटना घडली. प्रदीप कुमार हा उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील हरदी पोलीस ठाणे हद्दीतील परसोहना गावातील रहिवासी आहे. त्याचे कुटुंबीय लग्नासाठी मुलगी शोधत होते. यादरम्यान, लॉकडाऊनमध्ये त्यांना मोठा फटका बसला. एका ठिकाणी त्याचे लग्न जोडले गेले होते. मात्र, ते मोडले गेले. यानंतर प्रदीपने वर्तमानपत्रात जाहिरात पाहिली.

advertisement

लग्नासाठी संपर्क करावा, असे या जाहिरातीत म्हटले होते. त्यामुळे ही जाहिरात पाहिल्यावर प्रदीपने दिलेल्या क्रमांकावर फोन केला आणि याबाबतची माहिती घेतली. त्याचा फोन एका तरुणीने उचलला आणि त्या तरुणीने प्रदीपसोबत लग्नासाठी होकार कळवला. या तरुणीने आपले नाव खुशबू देवी असल्याचे सांगितले.

2 बायका, 4 मुले, तरीही सरपंच गर्लफ्रेंडसोबत गेला हॉटेलमध्ये, क्वालिटी टाईम घालवणं पडलं महागात

advertisement

हळहळू दोघांमध्ये संवाद सुरू झाला. तरुणीने प्रदीपसोबत गोड बोलून त्याच्या विश्वास संपादन केला आणि मग हळूहळू त्याच्याकडून लाखो रुपये उकळत आपल्या खात्यात टाकून घेतले. खुशबूने प्रदीपकडे पैशांची मागणी केल्यावर सुरुवातीला प्रदीपने नकार दिला. मात्र, नंतर त्याने होकार देत खुशबूच्या खात्यात 10 हजार रुपये जमा केले. अशाप्रकारे अनेकदा गोड बोलून खुशबूने प्रदीपकडून एकूण 1 लाख 70 हजार रुपये उकळले. त्यानंतर तिने आपला नंबर बंद केला आणि ती बेपत्ता झाली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वतःवर विश्वास ठेवला अन् स्वप्न साकार झालं, शेतकऱ्याच्या मुलगा झाला DYSP, Video
सर्व पहा

प्रदीप यांनी याप्रकरणाची तक्रार याआधीचे जिल्हाधिकारी डॉ. दिनेश चंद्र यांच्याकडे केली. त्यांच्या आदेशानुसार, अज्ञात तरुणीविरोधात प्रदीप विरुद्ध एफआयआरही नोंदवण्यात आला होता. मात्र, अद्याप खुशबू देवीचा शोध लागलेला नाही. या तरुणीने आपल्याशी लग्न करावे किंवा आपले पैसे परत करावे, अशी मागणी प्रदीप करत असून गेल्या दोन वर्षांपासून पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
तरुणीने दिले लग्नाला होकार, गोड बोलून पैसेही मागू लागली, शेवटी तरुणासोबत घडलं मोठं कांड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल