2 बायका, 4 मुले, तरीही सरपंच गर्लफ्रेंडसोबत गेला हॉटेलमध्ये, क्वालिटी टाईम घालवणं पडलं महागात
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
extra marital affair - जितेंद्र माळी असे या सरपंचाचे नाव आहे. हा सरपंच एका महिलेसोबत मोबाईलवर कायम बोलायचा. याबाबत त्याच्या पत्नीला संशय आला होता. त्यात नीमच येथून आपल्या घरापासून 210 किमी अंतरावर सरपंच आपल्या प्रेयसीसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचला होता.
शुभम मरमट, प्रतिनिधी
उज्जैन - गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या अनैतिक संबंधातूनच हत्या, आत्महत्या, तसेच बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 पत्नी तसेच 4 मुले असूनही सरपंच आपल्या प्रेयसीसोबत दिसून आल्याची घटना समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण घटना - 
मध्यप्रदेशच्या उज्जैनमधून ही घटना समोर आली आहे. जितेंद्र माळी असे या सरपंचाचे नाव आहे. हा सरपंच एका महिलेसोबत मोबाईलवर कायम बोलायचा. याबाबत त्याच्या पत्नीला संशय आला होता. त्यात नीमच येथून आपल्या घरापासून 210 किमी अंतरावर सरपंच आपल्या प्रेयसीसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी हॉटेलमध्ये पोहोचला होता.
advertisement
सरपंच आपल्या प्रेयसीसोबत उज्जैनमध्ये एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळताच पत्नी कारने नीमच रवाना झाली. येथे पोहोचल्यावर पत्नी हॉटेलबाहेर नवऱ्याची वाट बघू लागली. ज्यावेळी सरपंच आपल्या प्रेयसीसोबत हॉटेलबाहेर निघाले आणि कारमध्ये बसला. मात्र, समोर पत्नीला पाहताच त्याला मोठा धक्का बसला. पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले आणि यानंतर त्याच्या प्रेयसीला मारहाण सुरू केली.
advertisement
यावेळी प्रेयसीने तु कोण आहे असे विचारताच पोलीस ठाण्यात चल तुला सांगते, असे सरपंचाच्या पत्नीने सांगितले. प्रेयसीला मारहाण होत असल्याचे पाहून हॉटेलबाहेर रस्त्याच्या मधोमध गर्दी जमली. यावेळी सरपंच हाताने चेहरा झाकून गाडीत गुपचाप बसला होता. तर कुटुंबीयांनी याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
advertisement
सरपंचाला दोन पत्नी आणि चार मुले -
view commentsसरपंच जितेंद्र माळी याच्या पत्नीने सांगितले की, सरपंचने पहिले लग्न हे 20 वर्षांपूर्वी केले होते. आता तो तिच्यासोबत राहत नाही. मग 15 वर्षांपूर्वी त्याने दुसरे लग्न केले. जितेंद्रला दोन्ही पत्नींपासून दोन मुले आहेत. तर आता जितेंद्रला तिसरे लग्न हे अंगणवाडीत काम करणाऱ्या तरुणीशी तिसरे लग्न करायचे आहे. यामुळे तो मला मारहाण करतो, असा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. तर याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आली नसून तक्रार केल्यावर पोलीस कार्यवाही करेल, असे नानाखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र यादव यांनी सांगितले.
Location :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
November 16, 2024 7:22 PM IST
मराठी बातम्या/Viral/
2 बायका, 4 मुले, तरीही सरपंच गर्लफ्रेंडसोबत गेला हॉटेलमध्ये, क्वालिटी टाईम घालवणं पडलं महागात


