या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान अटोळे असं आत्महत्या करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो गेल्या काही काळापासून आपल्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. सुरुवातीला काही दिवस त्यांच्यात सगळं काही सुरळीत सुरू होतं.
मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांत खटके उडू लागले होते. याच वादातून प्रेयसी काहीच न सांगता अचानक निघून गेली होती. प्रेयसी सोडून गेल्याने समाधानला नैराश्य आलं होतं. तिच्या विरहात व्याकूळ झाल्यानंतर त्याने अचानक टोकाचं पाऊल उचललं. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आत्महत्या केली आहे.
advertisement
संबंधित व्हिडीओत समाधान डोक्यात बाटलीने स्वत:ला मारहाण करताना दिसत आहे. सुरुवातीला त्याने बाटलीने स्वत:ला मारून घेतल्यानंतर त्याने ऑन कॅमेरा विष प्राशन केलं. यानंतर काही वेळातच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका २५ वर्षांच्या तरुणाने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास केला जात आहे.
