धनंजय हिवराळे असं अटक केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. तर गोरख हिवराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव आहे. मयत गोरख हिवराळे हे खामगाव तालुक्यातील लोणी गुरव गावात कुटुंबीयांसोबत राहतात. गोरख यांना दारु पिण्याचं व्यसन आहे. दारु पिण्याच्या कारणातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी गुरु येथील धनंजय हिवराळे यांनी वडील गोरख हिवराळे हे नेहमीच आपल्या आईला दारू पिऊन त्रास देतात. याचाच राग मनात धरून वडिलांसोबत वाद केला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी मुलगा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने वडिलांची हत्या केल्याची कबुली दिली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी मृतकाचे दोन्हीही पाय तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे यामध्ये अजून आरोपी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. खामगाव ग्रामीण पोलिसांनी संशयित म्हणून मुलाची आई आणि मामाला देखील अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे देखील घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
