4 महिन्यांपूर्वी घरून पळाले होते
उत्तर प्रदेशातील मथुरेत एक आश्चर्यकारक प्रेमकथा समोर आली आहे. कर्नालमधील एका तरुणीचं 12 वर्षांपूर्वी नौझील पोलीस ठाण्यांतर्गत एका गावातील तरुणाशी लग्न झालं. महिलेला दोन मुले झाली. तिच्या लहान बहिणीचं 5 वर्षांपूर्वी लग्न झालं, तिलाही 2 मुले आहेत. पण लहान बहिणीचं मोठ्या बहिणीच्या नवऱ्याशी कधी प्रेमसंबंध जुळले हे कोणालाच कळलं नाही. मेहुण्याचंही मेहुणीवर प्रेम जडलं. त्यांनी पुन्हा नातं सुरू केलं. पण घरातील लोक त्यांच्यामध्ये अडथळा ठरले. कारण दोघेही विवाहित होते. त्यामुळे 4 महिन्यांपूर्वी मेहुणा आणि मेहुणी कोणालाही न सांगता गुपचूप घरून पळून गेले.
advertisement
आता कुटुंबीयांनी घातला गोंधळ
दोघेही नंतर रायपूर रोडवरील विटभट्टीवर आले आणि मजूर म्हणून काम करू लागले. दुसरीकडे, कुटुंबीयांना सुरुवातीला काहीच समजलं नाही. मग त्यांना मेहुणा आणि मेहुणी एकत्र पळून गेल्याचं कळलं. दोघांचा शोध घेऊन समुपदेशन करण्यात आलं. जेव्हा महिलेचा भाऊ तिला घेऊन जाऊ लागला, तेव्हा मेहुण्याने त्याला अडवलं. बहीणही मेहुण्याला साथ देऊ लागली. तिने भावाला सांगितलं की, आता हे माझे पती आहेत, बहिणीचे नाहीत. आम्ही दोघे एकत्र राहू. कोणी काहीही केलं तरी आम्ही जाणार नाही.
मेहुणा आणि भावाच्या भांडणाबद्दल ऐकून भाऊ संतप्त झाला
त्याने मेहुण्याला फटकारले. म्हणाला- तुला लाज वाटायला हवी. तू माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा आहेस. तुला 2 मुले आहेत. आता तुला माझ्या लहान बहिणीसोबत राहायचं आहे. याचवरून मेहुण्याला राग आला आणि दोघांमध्ये भांडण सुरू झालं. विटभट्टीच्या अकाउंटंटने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात आणलं. संपूर्ण घटना ऐकून पोलीसही थक्क झाले. त्यांनी दोघांनाही खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तोडगा निघाला नाही. इन्स्पेक्टर प्रभारी शैलेंद्र सिंह यांनी सांगितलं की, मेहुणी तिच्या मेहुण्यासोबत राहण्याचा हट्ट करत आहे. मेहुणा आणि भाऊ यांच्यातील भांडणाच्या प्रकरणात कारवाई सुरू आहे. दरम्यान, मोठी बहीण रडत आहे आणि तिची अवस्था वाईट आहे.
हे ही वाचा : चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू, महिलेच्या डोक्यावरून गेलं एसटीचं चाक
हे ही वाचा : नवरा टाळू लागला, अखेर पत्नीनं विचारलं, "काय झालंय?", सत्य सांगत पतीने केला मोठा कांड!
