चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू, महिलेच्या डोक्यावरून गेलं एसटीचं चाक

Last Updated:

Accident in Bhandara: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या वाहनी गावाजवळ एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.

News18
News18
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या वाहनी गावाजवळ एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका महिलेचा तिच्या दोन चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून जात असताना गाडी घसरल्याने महिला थेट एसटीच्या चाकाखाली आली. यात महिलेचा चिरडून मृत्यू झाला आहे. दोन चिमुकले आणि नवऱ्याच्या डोळ्यादेखत हा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मीना ओमेश्वर कडू असं मृत पावलेल्या ३५ वर्षीय महिलेचं नाव आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता त्या आपल्या पती आणि दोन मुलांसह दुचाकीवरून जात होत्या. हे चारही जण सरांडीवरून चिखला इथं आपल्या गावी जात होते. दरम्यान, सिहोरा येथील वाहणी गावाजवळून जात असताना दुचाकी स्लीप झाली. इथं एका पाण्याच्या टाकीजवळ शेण पडलं होतं. या शेणावरून चाक गेल्यानंतर दुचाकी घसरली.
advertisement
यावेळी मयत मीना या डांबरी रस्त्यावर खाली पडल्या. याचवेळी सिहोराकडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली मीना सापडल्या. त्यांच्या डोक्यावरून बसचं चाक गेलं. दुचाकी घसरल्यानंतर मीना यांचे पती आणि दोन मुलं रस्त्याच्या डाव्या बाजुला पडल्याने तिघं बचावले.
पण दुर्दैवाने या दुर्घटनेत मीना यांचा जीव वाचू शकला नाही. दोन मुलं आणि नवऱ्याच्या डोळ्यादेखत मीना यांचा बसच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. गावावरून आपल्या स्वगावी जाणाऱ्या कुटुंबावर अशाप्रकारे काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या/क्राइम/
चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत आईचा मृत्यू, महिलेच्या डोक्यावरून गेलं एसटीचं चाक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement