टेलिव्हिजनच्या सुरुवातीच्या काळात 'आभाळमाया' ही मालिका प्रेक्षकांनी पाहिली. मालिकेचं नाव आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर अनेक आता अनेक वर्षांनी 'अंधारमाया' नावाची एक वेब सीरिज झी 5वर आली होती. 'आभाळमाया', 'अंधारमाया' इथपर्यंत ठीक होतं पण आता 'काजळमाया' या नावाची एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. काजळमाया... नाव ऐकूनच थोडं विचित्र वाटलं ना! नाव इतकं विचित्र असेल मग मालिकेची स्टोरी काय असेल...
advertisement
( हिरोईनही तीच आणि व्हिलनही, मराठी टेलिव्हिजनवर आता चेटकीण येणार, हॉरर प्रोमो पाहिलात! )
'काजळमाया' ही मालिका लवकरच स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू होणार आहे. अभिनेता अक्षय केळकर या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहे. मालिकेचा पहिला प्रोमो देखील रिलीज झाला आहे. ही मालिका हॉरर असून प्रचंड थ्रील आणि सस्पेन्सनी भरलेली आहे.
काजळमायाची स्टोरी काय?
चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची ही गोष्ट. तिला चिरतारुण्याचं वरदान आहे. रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. स्वतःचं अस्तित्व आणि सगळ्यांना पायाशी आणण्याची महत्वाकांक्षा यापलिकडे कुठलाही विचार तिच्या मनात कधीच नसतो. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. तिच्या या महत्वाकांक्षेला जेव्हा आरुषकडून आव्हान मिळतं तेव्हा सुरुवात होते एका अद्भूत गोष्टीला. ही गूढ गोष्ट म्हणजेच काजळमाया.