TRENDING:

Priya Marathe : 'आदल्याच दिवशी मेसेज केलेला...', अभिजीत खांडकेकर भावुक, सांगितली प्रियाची शेवटची आठवण

Last Updated:

Abhijeet khandkekar on Priya Marathe : अभिजीत आणि प्रिया यांनी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत एकत्र काम केलं होतं. प्रियाच्या आठवणी सांगत अभिजीत खांडकेकर भावुक झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरनं निधन झालं. प्रियाच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. तिचे मित्र मैत्रिणी आणि सहकलाकार आजही तिच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. प्रियाच्या आजारपणात तिच्याबरोबर काही मोजके जणं होतं. त्यातील एक म्हणजेच अभिनेता अभिजीत खांडकेकर. अभिजीत आणि प्रिया यांनी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत एकत्र काम केलं.
News18
News18
advertisement

प्रियाबद्दल बोलताना अभिजीत भावुक झाला. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अभिजीत म्हणाला, "आज तिच्याबद्दल असं बोलावं लागेल याची मी कल्पनाही केली नव्हती. गेल्या दीड वर्षात तिला हा आजार झाला, कॉम्प्लिकेशन सुरु झाले. प्रियाचे कुटुंबीय, शंतनु आणि मोजक्या लोकांना याबद्दल माहिती होती त्यापैकी मीही होतो. आम्ही खूप चांगले मित्र होतो. तिची तब्येत इतकी ढासळत जाईल, एक दिवस अशी बातमी येईल याची कल्पना असूनही आपल्या मनाला ते पटत नसतं. अजूनही विश्वास बसत नाही."

advertisement

( Priya Marathe: पार्टीत भेट, मैत्री अन् प्रिया मराठे अशी पडली होती अभिनेता शंतनू मोघेच्या प्रेमात, साधी सिंपल LOVE STORY )

अभिजीतने सांगितलं की, "मी आदल्याच दिवशी तिला मेसेज केला होता. त्याआधी आमचं बोलणं व्हायचं. ती कोणालाही भेटायला तयार नव्हती, तिची इच्छाच नव्हती. पण तरीसुद्धा मी मित्र हट्टीपणा करतात तसं तिला विनंती करत होतो की मी येतो. बोलू नकोस पण मला एकदा येऊन भेटू दे, असं मी तिला म्हणायचो. पण शेवटी देवाच्या मनात जे असतं तेच होतं ते कोणीही बदलू शकत नाही. हे तथ्य आहे आणि आता आपल्याला ते मान्य करावं लागेल."

advertisement

"तिला शेवटचं बघणं खूप कठीण होतं"

"प्रियाला आम्ही छान तयार झालेलं नटलेलं पाहिलं आहे. त्या दिवशी बातमी आल्यानंतर तिला समोर बघणं खूप कठीण होतं. माझ्या मनात तिच्या सुंदर आठवणी कायम आहे. तिला शेवटचं बघणं खूप कठीण आहे."

प्रियासोबतच्या आठवणी 

प्रियासोबतच्या आठवणी सांगत अभिजीत म्हणाला, "मालिकेवेळी आम्ही एकत्र वेळ घालवला. सेटवर ती अगदी लहान मुलीसारखीच होती. आमच्या सेटवर दोन नाही तीन लहान मुली होत्या. आम्ही इतकं काम केलं, इव्हेंट्स केले. एकाच रस्त्यावर घर असल्याने एकमेकांसोबत गाड्या शेअर करणं, खाणंपिणं, आयुष्यातील अनेक गप्पा मारणं असं सगळंच केलं. आपल्यासमोर असं जवळच्या माणसाची तब्येत ढासळणं हे चटका लावणारं आहे."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Priya Marathe : 'आदल्याच दिवशी मेसेज केलेला...', अभिजीत खांडकेकर भावुक, सांगितली प्रियाची शेवटची आठवण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल